Milk 
पुणे

अखेर राज्य सरकारकडून पुन्हा अतिरिक्त दूध खरेदी सुरु; आता लिटरला मिळणार एवढे पैसे

गजेंद्र बडे

पुणे - अखेर राज्य सरकारने एक महिन्याच्या गॅपनंतर (खंड) पुन्हा एकदा अतिरिक्त दूध खरेदी सुरु केली आहे. आता हे अतिरिक्त दूध येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिलिटरमागे होणारा ५ रुपयांचा तोटा कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटरला २५ रूपयांचा दर मिळणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचा (कात्रज डेअरी) प्रतिदिन तीन लाखांचा होत असलेला तोटा आता पुर्णपणे कमी होणार आहे. 

राज्य सरकारने "अतिरिक्त दूध खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचा लॉस" या शिर्षकाखाली सकाळने २८ आॅगष्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर राज्य सरकारने १ महिन्याच्या खंडानंतर पुन्हा अतिरिक्त खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्यक्षात ही खरेदी सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लाॅकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलं होतं.  त्यातच हाॅटेलं बंद झाल्याने दुधाची मागणी घटली होती. याचाच फायदा उठवतं, खासगी दूध संघांनीही नेहमीच्या तुलनेत कमी आणि   तेही एकदम कमी भावानं शेतकऱ्यांकडून दूध खरेदी सुरु केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाआधार देण्यासाठी राज्य सरकारने १ एप्रिलपासून अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली होती. परंतू १ आॅगष्टपासून ही खरेदी थांबविण्यात आली होती. 

यामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज सरासरी  सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान होऊ लागले होते. कारण सरकारी नियमानुसार गाईच्या दुधाचा प्रतिलिटर किमान २५ रुपये दर आहे. सध्या प्रत्यक्षात सरासरी २० रुपये लिटरप्रमाणे दर मिळत होता. 

पुणे जिल्ह्यात  दररोज  सुमारे २० लाख लिटर दूध विविध दूध संघ खरेदी करत असतात. यापैकी सहकारी दूध संघ २५ रुपये तर, खासगी दूध संघ २० रुपये लिटरनेच दूध खरेदी करत आहेत. एकूण दुधापैकी ५ लाख लिटर सहकारी आणि सुमारे १५ लाख लिटर खासगी दूध संघ खरेदी करत असतात. यामुळे सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळून रोज ७५ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. 

राज्य सरकारने १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अतिरिक्त दूध खरेदी केले होते. पण मध्येच आॅगष्टमध्ये महिनाभर ही दूध खरेदी बंद पडली होती. आता पुन्हा दोन महिने ही खरेदी सुरू करण्यात आली आहे.
- रणजित देशमुख, अध्यक्ष, महानंद दूध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Latest News : काँग्रेसने प्रियांका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, पाच राज्यांमधील 'स्क्रीनिंग कमिटी' केली स्थापन

India Vs Bangladesh cricket : भारत आता बांगलादेश सोबतही नाही खेळणार क्रिकेट?; हिंसाचाराच्या घटनांचे क्रिकेट विश्वात पडसाद!

Manoj Jarange:समाजापेक्षा कुणीच मोठे नाही: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे; आंदोलनाची वेळ आल्यास सरकारचं अवघड होईल!

ShivrajSingh Chouhan: लाडकी बहीण योजना थांबणार नाही: केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान; विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक अपप्रचार!

Solapur politics: साेलापुरात कार्यकर्त्यांचे अश्रू नजरेआड! ‘आत्यावरील अन्यायाने’ व्यथित, तीस वर्षांपासून एकनिष्ठ अर्ज माघारी अन्..

SCROLL FOR NEXT