पुणे

अखेर राज्य ग्राहक आयोगाला मिळाले पूर्णवेळ अध्यक्ष

गेल्या आठ महिन्यांपासून हंगामी अध्यक्षांद्वारे कामकाज सुरू असलेल्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाला अखेर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या आठ महिन्यांपासून हंगामी अध्यक्षांद्वारे कामकाज (Work) सुरू असलेल्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाला (State Consumer Commission) अखेर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश पुखराज बोरा यांची नियुक्ती केली आहे. (Finally State Consumer Commission Got Full Time Chairman)

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. नवनियुक्त अध्यक्षांकडे वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत या पदाची सूत्रे असणार आहेत, असेही अधिसूचनेत नमूद आहे. आयोगाचे माजी अध्यक्ष ए. पी. भंगाळे यांच्या पदाचा कार्यकाळ १८ सप्टेंबर २०२० रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर आयोगाचे वरिष्ठ न्यायिक सदस्य डी. आर. शिरासाव यांची आयोगावर हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मात्र, त्यांना वादग्रस्त प्रकरणांवर सुनावणी व निर्णयाचे अधिकार सरकारने दिले नव्हते. त्यात कोरोनाकाळात आयोगाचे कामकाज थंडावले होते. त्यानंतर व्हर्च्युअल पद्धतीने सुनावण्या सुरू झाल्या. तरी हंगामी अध्यक्षांना अधिकार नसल्याने आयोगापुढील महत्त्वाच्या दाव्यांवरील सुनावणी रखडली होती. त्यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांना फटका बसत होता.

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाला आठ महिन्यांनंतर पूर्णवेळ अध्यक्ष लाभले आहेत, त्यामुळे आयोगापुढील प्रलंबित महत्त्वाच्या दाव्यांच्या सुनावणीला चालना मिळेल. यापुढील नियुक्त्या वेळेत होणे गरजेचे आहे.

- ॲड. ज्ञानराज संत, कन्झ्युमर ॲडव्होकेट्स असोसिएशन, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT