पुणे

अखेर 'त्या' वृद्ध दांपत्याला न्याय मिळाला

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - आई वडिलांनी बाधलेल्या खोलीत राहून त्यांचाच छळ करणाऱ्या मुलास निगडी पोलिसांनी अखेर घराबाहेर काढले. विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली.

शशिकला आणि एकनाथ देवगडकर या वृद्ध दांपत्याने आकुर्डी येथे काबाडकष्ट करून खोल्या बांधल्या. खोल्या भाड्याने देऊन त्यातून ते आपली उपजिविका चालविणार होते. आई वडिलांना सांभाळणे तर दूरच परंतु त्याच्या खोलीत मुलाने आपला संसार थाटला. आई वडिलांनी ठेवलेल्या भाडेकरूंना त्रास देऊन पळवून लावले. यामुळे घरखर्च कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. 

मुलाच्या विरोधात त्यांनी तहसीलदाराकडे दाद मागितली. उपविभागिय न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका महिन्यात खोली खाली करण्याची मुदत दिली. ती मुदत २८ डिसेंबर २०१८ रोजी संपुष्टात आल्यावरही मुलाने खोली खाली केली नाही. ही कैफियत त्यांनी दै.'सकाळ'कडे मांडल्यावर याबाबत १४ जानेवारी रोजी 'आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?' या शिर्षकाखाली बातमी प्रसिध्द झाली.

या बातमीची दखल सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, युवराज दाखले, श्रीधर काळे, उर्मिला काळभोर, नीता परदेसी यांनी घेतली. मुलाला घराबाहेर काढण्यासाठी त्यांनी पोलिसांवर दबाव निर्माण केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत निगडी पोलिसांना कारवाईबाबत सुचना दिल्या.

मुलानेही आपल्या ओळखीचा पुरेपूर वापर करीत ही कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक दबाव वाढल्यामुळे मुलाने गुरूवारी (ता.१७) खोली खाली केली.

"उपविभागीय न्यायदंडाधिरी, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस यांचे मी आभारी आहे. दै.'सकाळ'ने आमच्यावरील अन्यायाला वाचा फोडली नसती तर कदाचित आमची दखल कोणी घेतलीच नसती. त्यामुळे दै.सकाळचे विशेष आभारी आहोत."
शशिकला एकनाथ देवगडकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT