Marriage Sakal
पुणे

आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक साहाय्य

जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य योजना राबविण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सामाजिक न्याय विभागाकडून गेल्या वर्षभरात आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) करणाऱ्या साडेसहाशेहून अधिक नवदाम्पत्यांना (Newlyweds) तीन कोटी २८ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य (Economic Help) देण्यात आले आहे. त्यातून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या संसाराला उभारी मिळाली आहे. (Financial Assistance to Newlyweds Intercaste Marriage)

जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य योजना राबविण्यात येते. पुणे विभागात २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील ६५४ विवाहित जोडप्यांना ३ कोटी २८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या संयुक्त नावाने ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येतो.

जोडप्यांना वितरित केलेली रक्कम (लाखात)

जिल्हा जोडपी रक्कम

पुणे १८८ ९४

सातारा १४० ७०

सांगली १२० ६०

सोलापूर १०० ५०

कोल्हापूर १०८ ५४

योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी हे महाराष्ट्रातील रहिवासी असावेत. जातीचा दाखला आणि आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याबाबतचा अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असून, त्यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

- बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा समाज कल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Housing Society Election Rules : छोट्या हौसिंग सोसायट्यांना मोठा दिलासा! आता ३५ दिवसांऐवजी अवघ्या ९ ते १३ दिवसांत पार पडणार निवडणुका; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Devgaon Rangari Crime : जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत ८१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू! कुऱ्हाड, लोखंडी रॉडने हल्ला; मुलगा व नातूही जख्मी; दोघांना अटक, अन्य दोघांचा शोध सुरू

Latest Marathi News Live Update: अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेत महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक कांस्य

Pune News : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात पैसे घेऊन प्राध्यापक भरती; कंत्राटी प्राध्यापकांची महापालिकेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

Balewadi Crime : आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ३५ लाखांची फसवणूक; बालेवाडीतील २१ वर्षीय तरुणाला अटक, सोसायटीचा अध्यक्ष बनून म्हाडाच्या सदनिकांचेही दाखवले आमिष

SCROLL FOR NEXT