FIR against the Marriage Hall Owners for Violating social distancing Rules at wedding party 
पुणे

लग्नसोहळ्याला पाहुण्यांची गर्दी; मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा

सकाळवृत्तसेवा

पुणे  :  बेल्हा गावच्या हद्दीत एका विवाह सोहळ्यात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्याने मंगल कार्यालय मालकांवर आळेफाटा 'पोलिस स्टेशन'मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार. शनिवार (ता.२७) बेल्हा (ता.जुन्नर) येथील राज दरबार मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित केला होता. मंगल कार्यालयाचे मालक सुनील रामदास बडे यांनी जुन्नर येथील वाघ-भोसले यांच्या कुंटुबातील  विवाह सोहळ्यासाठी हे कार्यालय उपलब्ध करुन दिले होते. यावेळी सदर मंगल कार्यालयामध्ये अंदाजे ५०० ते ६०० लोक एकत्र जमले होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करण्यात आले नाही.

आरोग्य विभागाची भरती रद्द करा, सरळसेवेचा कारभार MPSCकडे द्या; मुख्यमंत्र्यांना साकडं 

मास्क व सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन न करता विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे  कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असूनही खबरदारी घेतली नाही.
हे कृत्य निष्काळजी आणि धोकादायक असून जिल्हाधिकारी पुणे यांचे नमूद आदेशाचे उल्लंघन केल्याने कार्यलय मालकांवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार हे करत आहे.

30 टक्के हॉटेल व्यवसाय अजूनही बंदच! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : पुण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT