FIR Filed against MLA Anil Bhosale and corporator Reshma Bhosale in Shivaji Bhosale Bank case
FIR Filed against MLA Anil Bhosale and corporator Reshma Bhosale in Shivaji Bhosale Bank case 
पुणे

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणी भोसले दांपत्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने आपापसात संगनमत करुन बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनवाट नोंदी करुन त्या खऱ्या असल्याचे भासवून बँकेच्या 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपयांचा वापर करुन बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी आमदार अनिल भोसले, नगरसेविका रेश्‍मा भोसले यांच्यासह बँकेच्या 16 संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगेश लकडे (वय 39, रा. आंबेगाव, नऱ्हे रोड) यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आमदार भोसले, नगरसेविका रेश्‍मा भोसले यांच्यासह बँकेच्या 16 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ऑडीटर आहेत. त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिवाजीराव सहकारी बँकेच्या 2018-2019 या आर्थिक वर्षाचे शिल्लक रकमेच्या हिशोबाची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी संबंधीत बँकेच्या रोख रक्कम शिल्लकची पडताळणी केली. बँकेच्या रोख शिल्लक तपासणीमध्ये एकूण 71 कोटी 78 लाख 87 हजार 723 रुपये इतकी रक्कम कमी असल्याचे निदर्शनास आले.
पीएमपी कामगारांसाठी खुशखबर! वाचा महत्वाची बातमी


संचालक मंडळ हे बँक व्यावसायिक आहेत, याची जाणीव असतानाही त्यांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी केल्या. त्या नोंदी खऱ्या असल्याचे भासवून त्या पैशांचा वापर करीत बँकेची फसवणूक केली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT