Pune 
पुणे

Pune: पुण्यात आगीचे सत्र सुरुच; मार्केटयार्डातील गोदामात अग्नीतांडव

पुण्यातील आगीचे सत्र सुरुच आहे.

धनश्री ओतारी

पुण्यातील आगीचे सत्र सुरुच आहे. दोनदिवसांपूर्वी टिंबरमार्केट येथे आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आता मार्केटयार्डातील गोदामात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी नाही. (Fire breaks out at paper godown in Marketyard)

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यराञी ०१•०५ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाऊनमधे आग लागल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. (Latest Marathi News)

गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खाञी केली. आग मोठी असल्याने जवानांनी अतिरिक्त मदत अग्निशमन वाहनांना पाचारण केले.

शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग त्या दिशैला पसरु नये याची विषेश खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवत सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी गोडाऊनमधे असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले.(Marathi Tajya Batmya)

घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. नुकसान व आगीचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कोणी जखमी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT