Fire Brigade 
पुणे

कुठे आग लागो, की घरे-झोपड्यांत पुराचे पाणी शिरो... आम्ही बाह्या सरसावून पुढे

ब्रिजमोहन पाटील

पुणे - कुठे आग लागो, की घरे-झोपड्यांत पुराचे पाणी शिरो... अग्निशामक दलाचे जवान बाह्या सरसावून पुढे होतात. अशा दुर्घटनांतील हानी टाळतानाच लोकांना जीवदान देण्याचे काम ही ब्रिगेड करते. लोकांना जीवदान देणाऱ्या या पठ्ठ्यांनी गेल्या दहा वर्षांत अडीच हजारांवर पक्षी आणि प्राण्यांना वाचवून भूतदयेचा अनोखा धडा पुणेकरांपुढे ठेवला आहे.

अशी सुरू होते मोहीम
अमूक एका ठिकाणी मांजा, वीजवाहिन्या, केबलमध्ये पक्षी अडकतो. कुठे ड्रेनेजच्या चेंबरमध्ये नाहीतर रस्त्यावरील खड्ड्यात एखादा प्राणी अडकून पडतो. कधी इमारतीच्या सजावर वा झाडाच्या शेंड्यावर अडकलेल्या एखाद्या मांजराचा सुटकेसाठी जिवाचा अंकात सुरू असतो. अग्निशामक दलाला १०१ क्रमांकावर याबाबत फोन येताच जवान लगेच तिकडे धाव घेऊन मोहीम फत्ते करतात. 

२६०५ दहा वर्षांत वाचविलेले पक्षी-प्राणी
१४ अग्निशामक दलाची केंद्रे
३९० जवानांची एकूण संख्या

आग विझविणे हीच आमची जबाबदारी; परंतु आमच्याकडे साहित्य असल्याने आम्ही मदतीसाठी जातो. यासाठी प्राणी मित्रांचीही मदत घेतो. सुखरूप सोडलेल्या प्राण्यांना कात्रज येथील अनाथालयात सोडले जाते.
- प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशामक दल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT