Pune Fire 
पुणे

Pune Fire : सदाशिव पेठेतील शैक्षणिक संस्थेत भीषण आग! वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू; ४० विद्यार्थीनी थोडक्यात बचावल्या

Pune Fire News : ही घटना गुरूवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सदाशिव पेठेतील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यालय व वसतिगृहाला लागलेल्या आगीत वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यु झाला. अग्निशामक दल वेळेत पोचल्याने वसतिगृहातील ४० विद्यार्थीनींची सुटका होऊ शकली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरूवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सदाशिव पेठेतील वाणिज्य विषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेची तीन मजली इमारत आहे. तेथेच विद्यार्थीनींना राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री दीड वाजता संबंधित संस्थेला आग लागली. काही वेळातच आगीच्या झळा वसतिगृहाच्या खोल्यांपर्यंत पोचल्या. आगीच्या झळा व धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशामक दलास मिळताच, दलाचे तीन बंब, टँकर, रेस्क्‍यू व्हॅन घटनास्थळी पोचले. तर वसतिगृहामध्ये विद्यार्थीनी अडकल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली.

जवानांनी आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा सुरू करून अर्ध्या तासात आग आटोक्‍यात आणली. त्याचवेळी ४० विद्यार्थीनींची सुखरूप सुटका केली. आग नियंत्रणात आल्यानंतर शोध घेताना संस्थेच्या कार्यालयातच झोपलेले व्यवस्थापक राहूल कुलकर्णी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे जवानांना आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्ण्लयात पाठविला. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यावेळी उपस्थित होत्या.

आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र त्याबाबतचा अहवाल महावितरणकडून (एमएसईबी) मागविला आहे. अहवाल आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. - दीपाली भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे.

...अन्‌ त्यांना रडू कोसळले!

संस्थेत शिक्षण घेणाऱ्या व तिथेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनी आगीच्या या घटनेमुळे चांगल्याच घाबरल्या होताया. या घटनेत विद्यार्थीनींचे शैक्षणिक साहित्य, कपडे, मोबाईल व अन्य आवश्‍यक वस्तु जळून खाक झाल्या. दरम्यान, आगीची घटना अनुभवलेल्या विद्यार्थीनींना या घटनेमुळे अक्षरशः रडू कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना आधार दिला. त्याचबरोबर संस्थेचेही शैक्षणिक साहित्य, फर्निचर, संगणक अशा वस्तु जळून खाक झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT