Chinchwad Fire News sakal
पुणे

Chinchwad Fire News : चिंचवडमध्ये आगीत सात वाहने खाक

मोरवाडीतील भंगार मालाला बुधवारी लागलेली आग शमते न् शमते तोच चिंचवडमध्ये रविवारी सकाळी आगीचे तांडव बघायला मिळाले. प्लंबिंग साहित्याचे गोदाम, जेसीबीसह सात वाहने खाक झाली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोरवाडीतील भंगार मालाला बुधवारी लागलेली आग शमते न् शमते तोच चिंचवडमध्ये रविवारी सकाळी आगीचे तांडव बघायला मिळाले. प्लंबिंग साहित्याचे गोदाम, जेसीबीसह सात वाहने खाक झाली. ज्वाळांमुळे चिंचवडगाव ते काळेवाडी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनाही धग लागत होती.

चिंचवड आणि काळेवाडीतील एमएम चौक यांना जोडणाऱ्या पवना नदीवरील पुलालगत केशवनगरमध्ये रस्त्याच्या कडेला गोदाम होते. त्यात सर्व प्लंबिंगचे साहित्य होते. बाहेर चार दुचाकी, एक मोटार, एक टेम्पो व एक जेसीबी उभा होता.

या सर्व साहित्यासह गोदाम व कार्यालय जळून खाक झाले. त्याला लागून काही पत्राशेडची दुकाने आहेत. रस्त्याच्या कडेला थाटलेली नर्सरी, माठ व शीतपेय विक्रीची दुकानेही असतात. सकाळी नऊच्या दरम्यान आग लागली.

काही कळण्याच्या आतच तिने उग्र रूप धारण केले. महापालिका अग्निशामक दलाच्या प्राधिकरण उपकेंद्रातील एक बंब व पाच कर्मचारी आगीबाबत कळल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे स्वरूप पाहून त्यांनी आणखी बंब व जवान बोलविले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

रिक्षातून प्रवास करणाऱ्या आजीबाईला लुटणाऱ्या चौघी जेरबंद! बुडालेल्या समर्थ बॅंकेच्या लॉकरमधून पैसे घेऊन जात होत्या घरी, वाढदिवसाच्या दिवशीच चोरी

MLA Rahul Awade : पंचगंगा नदी गाळमुक्त करणार; जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा

SCROLL FOR NEXT