fire1.jpg 
पुणे

Video : कुरकुंभ येथे केमिकल साठ्याला आग; परिसरात धुराचे लोट

सकाळवृत्तसेवा

कुरकुंभ  (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील कुसुम डिस्टिलेशन अॅड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत केमिकल साठ्याला आग लागली. ही  आज सकाळी साडेदहाला लागली आग विझविण्याचे काम सध्या सुरू आहे. आगीचे लोट मोठ्या  प्रमाणात पसरत असल्याने तिथल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेत  कोणतीही जीवितहानी झाली नाही.
         

कुसुम डिस्टिलेशन अॅड रिफायनरी कंपनीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये प्रक्रियेसाठी वापरलेल्या  साॅलवंटमधून केमिकल वेगळे करण्याची प्रक्रिया केली जाते अशी प्राथमिक माहिती आहे. आगीत कंपनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी दौंड नगरपालिका, औद्योगिक विकास महामंडळ व परिसरातील इतर कंपन्यांचे अग्निशामक बंब प्रयत्न करीत आहेत.

आगीत केमिकलने भरलेल्या ड्रमचे स्फोट वारंवार होत असल्याने आकाशात आगीचे व धुराचे लोट उंच जात आहेत. त्यामुळे कुरकुंभ व परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगचा भडका मोठा असल्याने आग विझविण्यास वेळ लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

खराब अन्न मिळालं? आता QR कोड स्कॅन करा, फोटो-व्हिडिओसह तक्रार करा, FDA चा मोठा निर्णय, नेमकी सुविधा काय?

'धर्मवीर' पाहिल्यावर रस्त्यावर प्रसाद ओकची वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरे; अभिनेत्याने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- त्यांनी...

Marathi News Live Updates : गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणारा गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा पोलिसांनी पकडला

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

SCROLL FOR NEXT