खडकी - सेंट जोसेफ बॉइज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके दाखविताना जवान. 
पुणे

स्कूलमधील विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे धडे

सकाळवृत्तसेवा

पुणे - सेफ किड्‌स फाउंडेशन, हनिवेल, पुणे महापालिका आणि पुणे मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभागातर्फे अग्नी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले. या अंतर्गत खडकी येथील सेंट जोसेफ बॉइज स्कूलमधील विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

प्रात्यक्षिकाचा एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला आणि आगीसंदर्भात आपत्कालीन तयारीचे महत्त्व जाणून घेतले. अग्निशामक यंत्रणेच्या विविध उपकरणांबाबत पीएमआरडीएच्या सुनील इंगवले, सुजित पाटील आणि विनय महाजन यांनी माहिती दिली.

पुण्याच्या अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘‘आजच्या काळात विद्यार्थ्यांना अग्निशामक उपाययोजना व त्यासंबंधी कौशल्याचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.’’ देशभर दरवर्षी २१ जानेवारी रोजी ‘नॅशनल फायर ॲन्ड इव्हॅक्‍युएशन ड्रील डे’ साजरा केला जातो. 

या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध शाळा, समुदाय आणि सोसायट्या, अशा ३२ ठिकाणी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. तसेच आंतरशालेय स्पर्धेचेही आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Pension Yojana limit : मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार, 'या' लोकांना होणार मोठा फायदा!

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळेंनी मतदानाचा अधिकार बजावला

Ashok Kharat SIT Probe : नाशिकच्या भोंदू बाबाला गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे डॉक्टर रडारवर; सोनोग्राफी सेंटर्स-डॉक्टरांचे लागेबांधे? SIT तपासात धक्कादायक खुलासे

Solapur Municipal Corporation: सोलापूर महानगरपालिकेत प्रथमच शिवसेना, काँग्रेसला ‘नो एन्ट्री’; सात विषय समित्यांमध्ये भाजपचे ५६ तर एमआयएमचे सात सदस्य, सभापतिपदासाठी रस्सीखेच!

Ichalkaranji MLC news : इचलकरंजीला आणखी एक आमदार मिळणार, सुरेश हाळवणकर विधान परिषेदवर जाणार

SCROLL FOR NEXT