pirangut fire 
पुणे

पिरंगुटला दीड तासांत या दोन कंपन्यांमध्ये आग 

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील पिरंगुट परिसरातील दोन कंपन्यांमध्ये आज केवळ दीड तासांच्या अंतराने आग लागण्याच्या घटना घडल्या. 

सुरवातीची आग व्हल्कन कंपनीत लागली. त्यानंतर फ्रॅंकॉईस कॉंप्रेसर या कंपनीत लागलेल्या आगीत दोन जनरेटर जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेच्या लपंडावामुळे स्पार्किंग व शॉर्टसर्किटमुळे येथील दोन जनरेटर जळाले. सुमारे सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सुदैवाने या घटनेपूर्वी व्हल्कन कंपनीतील आग विझविण्यासाठी आगीचे दोन बंब आले होते. तेच अग्निशमन दल योगायोगाने या आगीला आटोक्‍यात आणण्यासाठी उपयोगाला आले. तातडीने या दोन्हीही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्‍यात आली व पुढील अनर्थ टळला. 

या आगीबाबत फ्रॅंकॉईस कॉंप्रेसर कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक अमोल निंबाळकर यांनी माहिती दिली की, कंपनीच्या परिसरात काल (ता. 14) झालेले वादळी वारे व पाऊस आदींमुळे पिरंगुट परिसरात वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. मात्र, वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर विजेचा लपंडावही सुरू झाला. त्यामुळे स्पार्किंग व शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली आहे. त्यात दोन जनरेटर जळाले असून, तीस लाख रुपयांचे नुकसान झाले.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कारखानदारांची मागणी 
एकाच दिवशी केवळ दीड तासांच्या अंतराने आग लागण्याच्या सलग दोन घटना घडल्यामुळे परिसरातील विविध कारखानदारांनी आपल्या प्रतिक्रिया "सकाळ'कडे नोंदविल्या आहेत. जेबी कंपनीचे मालक श्रीधर जोशी म्हणाले, ""पिरंगुट परिसरात सुमारे आठशेहून अधिक कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या असताना आगीच्या घटनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मोठे नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी या भागात अग्निशमन केंद्राची अत्यंत गरज आहे.'' उद्योजक बसवराज बिन्नी म्हणाले, ""या भागात दर दोन महिन्यांनी कुठे ना कुठे एक तरी आगीची घटना घडतेच. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्र तातडीने उभारावे.'' अशाच प्रतिक्रिया येथील उद्योजक अजित गाडगीळ, सरदेसाई व अन्य कारखानदारांनी व्यक्त केल्या आहेत. 

सुप्रिया सुळे म्हणतात... 
व्हल्कन कंपनीच्या आगीची बातमी "ई सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. ती बातमी वाचून खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनांची चौकशी केली. त्या म्हणाल्या, ""पिरंगुट परिसरात बऱ्याच कंपन्या आहेत. अनेकदा येथे आगीच्या घटना घडतात. येथे आजही दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये भविष्यात जीवित व वित्तहानी होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. यासाठी येथे अग्निशमन दलाचे एक केंद्र असावे, यासाठी पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच येथे हे केंद्र सुरू होईल, अशी मला आशा आहे.'' 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT