Bullock Cart Race esakal
पुणे

शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारातून बारामती तालुक्यात गोळीबार; सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षांच्या मुलांनी झाडल्या गोळ्या

रणजित यांनी गौतम यांच्याकडून एक वर्षांपूर्वी सर्जा बैल घेत पहिला व्यवहार केला होता.

संतोष शेंडकर

रणजित यांच्याकडे 'सुंदर' नावाचा बैल असून तो खरेदी करण्यासाठी सोमवारी गौतम व संतोष तोडकर हे दोघे रणजित त्यांच्याकडे गेले. पाच लाख रूपये इसार देऊन गौतम हे बैल निंबुतला घेऊन आले.

सोमेश्वरनगर : शर्यतीच्या बैलाच्या (Bullock Cart Race) खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून बिनसल्याने निंबुत (ता. बारामती) येथे मध्यरात्री एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये रणजित एकनाथ निंबाळकर (रा. तावडी, ता. फलटण जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे व गौरव शहाजीराव काकडे या दोघा भावांसह तीन अनोळखी तरूणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दोघेही सोमेश्वर कारखान्याचे (Someshwar Factory) माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांची मुले आहेत. गुरूवारी रात्री अकरा ते शुक्रवारी पहाटे दोनपर्यंत घडलेल्या या प्रकरणाची अंकिता रणजित निंबाळकर (वय २३) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, रणजित यांनी गौतम यांच्याकडून एक वर्षांपूर्वी सर्जा बैल घेत पहिला व्यवहार केला होता.

रणजित यांच्याकडे 'सुंदर' नावाचा बैल असून तो खरेदी करण्यासाठी सोमवारी गौतम व संतोष तोडकर हे दोघे रणजित त्यांच्याकडे गेले. पाच लाख रूपये इसार देऊन गौतम हे बैल निंबुतला घेऊन आले. गुरूवारी उरलेले ३२ लाख घेण्यासाठी रणजित सकाळी निंबुतला गेले होते. पण, पैसे मिळाले नाहीत. गुरूवारी रात्री अकरा वाजता ३२ लाख देतो म्हणून गौतम यांनी बोलविले. रणजित, अंकिता, मुलगी अंकुरण, वैभव भारत कदम, पिंटू प्रकाश जाधव हे चारचाकीतून निंबुतला गौतम यांच्या निवासस्थानी गेले. घरासमोरील बाजेवर बसल्यावर गौतम यांनी,"मी पैसे देत नाही असे का सांगतिलेत? मी तुम्हाला सकाळी पैसे देतो आता स्टँपवर सही करा" असे म्हटले.

यावर रणजित यांनी, "राहिलेले सगळे पैसे द्या नाहीतर इसार परत देतो. माझा बैल मला परत द्या" असे म्हटले. यावर गौतम यांनी बैल कसा घेऊन जातो तेच बघतो असे म्हणत गौरव काकडे व तीन पोरांना बोलवून घेतले. काठी उगारत शिविगाळ केली. याचवेळी गौरव यांनी बैल कसा नेतो ते बघतो म्हणत, त्यांच्याकडील पिस्तुलातून रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली. दरम्यान, रणजित यांना बारामतीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी गौरव काकडे व आणखी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. वडगाव निंबाळकर पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT