पुणे - मुंबई प्रमाणेच पुणे शहराच्या उपनगरातही आता गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. आत्तापर्यंत १०० मिटर उंचीपेक्षा जास्त १९ प्रकल्पांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. प्रथमच महापालिकेकडून १६० मिटर म्हणजेच ४० मजली इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही इमारत बोपोडीमध्ये उभी राहणार आहे.
तर आत्तापर्यंत बाणेर, बालेवाडी, खराडी, वडगावशेरी या भागात आत्तापर्यंत सर्वाधिक उंचीच्या इमारतींना बांधकामासाठी महापालिकेने परवानगी देण्यात आली आहे.
संगमवाडी, बिबवेवाडी, औंध, येरवडा आदी भागात यापूर्वी १०० मीटरच्या आतील बांधकामांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवार आणि सोमवार पेठेत प्रत्येकी ८२.५ मिटर आणि १०४ मीटरच्या उंचीच्या इमारतींना परवानगी दिली आहे.
पुणे शहराची लोकसंख्या वाढत असताना राज्य सरकारने वेळोवेळी हद्दवाढ केलेली आहे. यामध्ये १९९७ मध्ये २३ गावे घेतली, त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये २०२१ पर्यंत ३५ गावांचा समावेश शहरात झाला आहे. हद्दवाढ होत असताना या उपनगरांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अनेक मोठे बांधकाम प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे.
शहरात खराडी, वडगावशेरी, बाणेर, बालेवाडी या भागात आयटी कंपन्यांची संख्या जास्त असल्यानेच याच भागात सर्वाधिक सदनिका घेण्याचेही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारती देखील याच भागात जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
रस्ता रुंदी आणि भूखंडाचे क्षेत्रफळ विचारात घेऊन ७० मीटरपेक्षा जास्त उंच इमारत बांधण्यासाठी काही अटींवर परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. यासमितीच्या माध्यमातून प्रस्तावांची छाननी करून प्रकल्पांना मान्यता दिली जात होती. मध्यंतरी हे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायराइज कमिटीची काल (ता. ९) बैठक झाली. याबैठकीत आत्तापर्यंतच्या सर्वात उंच म्हणजे १६० मिटर उंचीच्या इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेने आत्तापर्यंत ४१ उंच प्रस्तावांना मान्यता मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १५ प्रकल्प हे १०० मिटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतींचे आहेत.
भाग आणि प्रकल्प संख्या
बाणेर - ५
बालेवाडी -५
खराडी - ४
वडगावशेरी -४
बिबवेवाडी - ३
एरंडवणे - ३
गुलटेकडी -३
येरवडा २
मुंढवा -२
संगमवाडी -१
शुक्रवार पेठ -१
औंध - १
कोंढवा -१
वानवडी - १
घोरपडी - १
मंगलदास रस्ता - १
महंमदवाडी १
बोपोडी -१
सोमवार पेठ - १
वर्ष आणि दिलेल्या परवानग्या
२०१६ - २
२०१८ - ७
२०१९ - ३
२०२० - ८
२०२१ - ९
२०२२ -४
२०२३ -४
२०२४ - ४
उंचीनिहाय परवानग्या
१२६ मीटरपेक्षा जास्त - २
१०० ते १२५ मीटर -१७
९० ते ९९ मीटर - ९
९० मीटरपेक्षा कमी उंचीच्या इमारती - १३
‘शहरात उंच इमारती बांधण्याचे प्रमाण वाढत जात आहे. २४ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावरील तसेच सर्व निकषांची पूर्तता करत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चार प्रस्तावांना मान्यता दिली आहे. या बांधकाम प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी करून या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे.’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.