Defense Expo sakal
पुणे

Defense Expo : मोशीत आजपासून ‘डिफेन्स एक्स्पो’ ; उद्योगमंत्री सामंत यांच्याकडून पूर्वतयारीची पाहणी

संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारे देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ भरविले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोशी : संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारे देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ भरविले जात आहे. त्याद्वारे, देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार आहे. त्यामुळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे शनिवारपासून (ता. २४) सोमवारपर्यंत (ता. २६) प्रदर्शन भरविण्यात येत आहे. त्याच्या पूर्वतयारीचा सामंत यांनी आढावा घेतला. तेथे मांडण्यात येत असलेल्या शस्त्रास्त्रांची पाहणी करुन माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच प्रदर्शन दालनांना भेट देऊन उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले,‘‘प्रदर्शनातील विविध सत्रांत देशाची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे. शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे.’’

असे असेल प्रदर्शन

  • देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्स्पो

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना

  • नौदल, लष्कर आणि हवाईदल या तीनही सुरक्षा दलांचा सहभाग

  • चार भव्य दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड व पन्हाळा अशी नावे

  • प्रदर्शनासाठी एकूण २० दालने तयार

  • हेलिकॉप्टर, रणगाडे, संरक्षण वाहने, तोफा पाहता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT