Vehicle sakal
पुणे

Baramati News : बारामतीच्या आयएसएमटीतून प्रिमियम ट्यूबिंगची पहिली गाडी रवाना

बारामती येथील आय. एस. एम. टी. ट्यूब प्लँटमधून प्रिमियम ट्यूबिंगच्या पहिल्या उत्पादनाची पहिली गाडी नुकतीच ओ. एन. जी. सी.च्या आगरतळा प्लँटकरीता रवाना झाली.

मिलिंद संगई

बारामती - येथील आय. एस. एम. टी. ट्यूब प्लँटमधून प्रिमियम ट्यूबिंगच्या पहिल्या उत्पादनाची पहिली गाडी नुकतीच ओ. एन. जी. सी.च्या आगरतळा प्लँटकरीता रवाना झाली.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निशिकांत एकतारे यांनी गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. या प्रसंगी एकतारे म्हणाले, ओ. एन. जी. सी. व ओ. सी. टी. एल. यांच्या मुळे आय. एस. एम. टी.चा प्रकल्प साकारला आहे.

मार्च 2022 मध्ये किर्लोस्कर फेरसने आय.एस.एम.टीचे अधिग्रहण केल्यानंतर व्यवस्थापनाने सर्वांगिण विस्तारासाठी ओएनजीसी व ऑईल सेक्टर विभागात उत्पादन वाढविण्याची जबाबदारी स्विकारली आहे.

भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमात आयएसएमटी कंपनी सहभागी आहे ही गौरवास्पद बाब आहे. प्रिमियम जोड हे उच्च तंत्रज्ञानाचे ठराविक एकाधिकाराचे उत्पादन असून ऑईल व गॅस उत्पादन करणा-या विहीरीला जोडण्या-या पाईपमध्ये वापरतात.

हे प्रिमियम थ्रेड जोड असलेली ट्यूब किंवा पाईप अत्यंत प्रतिकूल हवामान व कठीण भौगोलिक परिस्थितीत समुद्रात, खोल पाण्यात व उभ्या आडव्या गॅस ऑईल विहीरीत पाईप जोडण्यासाठी वापरतात. या कनेक्शमुळे उच्च शक्ती, घट्टता तसेच टॉर्शनल वळण व ताण यावर उत्तम प्रकारे काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi IT Park bus accident : पुण्यातील हिंजवडी IT पार्कमध्ये भीषण अपघात; भरधाव बस फूटपाथवर चढली अन् दोन भावंडाना चिरडलं!

Mumbai News: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या!सीवूड्स-दारावे स्थानकाचे नाव बदलले; रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, कारण काय?

Pune Crime : नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; शहरात मोठ्या प्रमाणावर विक्री; सात हजार नशेच्या गोळ्या जप्त!

Latest Marathi News Live Update: राज्यात तीन दिवस ड्राय डे ; जिथं निवडणूक तिथं दारू दुकाने बंद

Haveli elections : हवेली तालुक्यात निवडणुकीत बदलती समीकरणे; यात्रा,देवदर्शन,लक्ष्मीदर्शन की विकास!

SCROLL FOR NEXT