Temperature Increase sakal
पुणे

Pune News : मूर्तिजापुरात उष्माघाताचा पहिला बळी

शवविच्छेदन अहवाला नंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल

सकाळ डिजिटल टीम

मूर्तिजापूर : तालुक्यांतील सोनोरी येथील ३८ वर्षीय इसम आज संध्याकाळी ५.३० वाजे दरम्यान येथील अकोला नाक्याजवळ अत्वस्थावस्थेत आढळला असून त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाला नंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. 

प्राप्त माहितीनुसार सोनोरी येथिल ३८ वर्षीय शेख अश्फाक शेख भुरू हा स्थानिक एम् आय डी सी परिसरात  मोलमजुरी करीत असून आज सायंकाळीं 5.30वाजे दरम्यान अकोला नाक्याजवळ भर उन्हात बेशुद्ध अवस्थेतच पडला असल्याची माहिती सिटी पोलिसांना मिळताच हेड पोलिस कॉन्स्टेबल अनिल राठोड हे घटना स्थळी रवाना होवून सदर इसमास संत गजानन महाराज आपत्कालीन पथकाचे सेनापती, बादशाह अमोल खंडारे यांच्या मदतीने स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास मृत घोषित करीत  उन्हात बराच वेळ पडून राहल्याने सदर इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला 

 घटनेवरुन सदर प्रकरणी सिटी पोलिस ठाण्यात कलम 174 सी आर पी सी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे याच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलिस कॉन्स्टेबल अनिल राठोड करीत आहे.

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अचानक छापा

SCROLL FOR NEXT