पुणे

लुटेरी बहुसह पाच जणांना अटक; मंचर पोलिसांची कामगिरी

डी. के. वळसे पाटील

मंचर : भराडी (ता. आंबेगाव) येथील नितीन कांताराम कुरकुटे यांच्यासोबत लग्न करून चार लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेलेल्या वधूसह एकूण पाच साथीदारांना मंचर पोलिसांनी नांदेड, परभणी व लातूर भागात जाऊन अटक केली आहे. लग्नाचा बहाणा करून ही टोळी संगनमताने पैसे कमावण्याच्या उद्देशाने वर कुटुंबियांची फसवणूक करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मंचर पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

याप्रकरणी वधू लक्ष्‍मी मच्छिंद्र चव्हाण, (रा. शिंगणापूर जि. परभणी) मध्यस्थी नवनाथ महादेव गवारी (रा. मेंगडेवाडी ता. आंबेगाव), गोविंद ज्ञानोबा मुस्करकर (वय ३२ रा. लातूर), सोनाली केशव काळे, केशव कुंडलिक काळे (दोघे रा. नांदेड) यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. मावशी व काकाचा पोलिस शोध घेत आहेत.

लग्न जमवून देण्यासाठी गवारी याने दीड लाख रुपये घेतले होते. भराडी येथे लग्न झाल्यानंतर वधू लक्ष्मी आठ दिवस राहिली होती. पाच तोळे सोन्याचे दागिने घेऊन तिने परभणी येथे आजारी असलेल्या मावशीला भेटण्यासाठी जाते असा बहाणा करून तिने  पोबारा केला होता. परत ती सासरी आली नाही. या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार (ता. २२ मार्च) रोजी कुरकुटे यांनी मंचर पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

अशा पद्धतीचे अनेक गुन्हे पुणे जिल्ह्यात घडले आहेत. पण प्रतिष्ठेपोटी पोलिसांकडे फिर्याद देण्यास नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव   देशमुख यांनी पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांना टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस नाईक अजित मडके, पोलिस नाईक राजेंद्र हिले, योगेश रोडे, सुनिता बटवाल, वैशाली बिडकर, रेश्मा घाडगे, शर्मिला होले यांच्या पथकाने प्रथम गवारीला अटक केली. त्यानंतर नांदेड लातूर परभणी बीड हा परिसर पिंजून काढला. लक्ष्मी व इतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे आरोपींना अटक केली. अजून लक्ष्मीची मावशी कमल नामदेव जाधव, काका नामदेव जाधव  यांचा पोलिस शोध घेत आहेत. वधू लक्ष्मीचे पती हयात नाहीत. तीला दोन मुले आहेत. सर्वांनी पैश्यांचे समान वाटप करून घेतले. पैश्यांसाठीच फसवणूक केल्याची आरोपींची कबुली.

घटनाक्रम- 14 फेब्रुवारी रोजी शिंगणापूर परभणी येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम.
-15 फेब्रुवारी रोजी भराडी येथे लग्न.
-21 मार्च रोजी वधू लक्ष्मीचे पलायन. 
-22 मार्च रोजी नितीन कुरकुटे यांची फसवणूक झाल्याचा मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
-27 मार्च रोजी मध्यस्थी नवनाथ गवारीला अटक.
-28 मार्चला पोलीस पथक परभणीकडे रवाना.
-01    एप्रिलला वधू  लक्ष्मीला लिंबा परभणी येथे अटक.
-03  एप्रिल उदगीर लातूर येथे गोविंद मुस्कर, सोनाली काळे, केशव काळेला अटक. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT