In Uruli Kanchan the number of corona patients reached
In Uruli Kanchan the number of corona patients reached  
पुणे

पुणे : उरुळी कांचनमध्ये आणखी 5 कोरोनाबाधित; एकुण रुग्णांची संख्या पोहचली

सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन शहरवासियांनो, आत्तातरी जागे व्हा, सतर्क रहा, काळजी घ्या, मास्कचा वापर करा व आपल्या प्रियजनांनाही मास्कचा वापर करण्यास भाग पाडा... कारण आपल्या बेफीकीरवृत्तीमुळे उरुळी कांचन शहरात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरतोय! मागील चोवीस तासाच्या कालावधीत तीन महिलांसह कोरोनाचे पाच नवे रुग्ण उरुळी कांचन शहाराच्या हद्दीत आढळून आले आहेत. शहरातील एक्टीव्ह रुग्णांची संख्या तब्बल तेरावर पोचली आहे. 

उरुळी काचन शहरात शनिवारी तीन तर रविवारी दोन असे मागील चोवीस तासात कोरोनाचे नवे पाच रुग्ण आढळुन आले आहेत. वरील पाच रुग्णात एका सत्ताविस वर्षीय गरोदर महिलेचाही समावेश आहे. तर उर्वरीत चार रुग्णांपैकी एक जण मुबईहुन आला आहे. तर दुसरा पुण्यातील शुक्रवार पेठेमधील एका दुकानातील कर्मचारी आहे. तर दोन महिला यापुर्वीच्या उरुळी कांचनमधील एका रुग्णांच्या संपर्कात आल्याने पॉझिटीव्ह असल्याचे निस्पन्न झाले आहे. दरम्यान मागील चोवीस तासात तीन महिला व दोन पुरुष असे पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळुन आल्याच्या वृत्तास उरुळी कांचन येथील आरोग्य केद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दुजोरा दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उरुळी कांचन शहरात अडीच महिण्यापुर्वी एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेच्या रुपाने कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर टप्प्याटप्याने कोरोनाचे आठहून अधिक रुग्ण आढळून आले तरी, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने वेळोवेळी घेतलेल्या काळजीमुळे रुग्ण वाढीवर मर्यादा राहिल्या होत्या. मात्र मागील सात दिवसाच्या काळात रुग्ण वेगाने वाढत असतांना, नागरीक मात्र भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करताना विनामास्क व सोशल डिस्टसिंग पाळत नसल्याचे सर्रास दिसुन येत आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांच्यावर ग्रामपंचायत प्रसासन व लोणी काळभोर कारवाई करत असले तरी, कारवाईत दम नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आत्तातरी जागे व्हा, सतर्क रहा व मास्कचा करा व आपल्या प्रिय जनाना मास्कचा वापर करण्यास भाग पाडा अशी म्हणन्याची वेळ आली आहे. 

कोरोनाचा आकडा वाढतोय; पुणे जिल्ह्यातील 'हा' तालुका डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर! 
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, शनिवारी दिवसभरात आलेल्या तीन रुग्णापैकी गरोदर महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर उर्वरीत दोन रुग्णांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. वरील तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकोनतीस जनांना होम कोरोटांईन करण्यात आले असुन, हायरिस्क असलेल्या नातेवाईकांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासनीसाठी रविवारी (ता. ५) सकाळी पाठवण्यात येणार आहेत. तर मागील तीन दिवसापुर्वी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळुन आलेल्या सऱाफ व्यावसायिकांच्या संपर्कातील पाच जनांच्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. तर दुसरीकडे रविवारी (ता. 5) सकाळीच उरुळी कांचन गावठाणातील आनखी दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT