corona 
पुणे

जुन्नर तालुक्यातील या गावांमध्येही आढळले कोरोनाचे रुग्ण 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील कोरोनाबधितांच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८८ इतकी झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

जुन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत चार गावांतील सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नारायणगाव येथे दोन, तर धनगरवाडी, शिरोलीतर्फे आळे व धालेवाडी येथे प्रत्येकी एक, असे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उपचार घेणारे ३४ रुग्ण, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५१ झाली आहे. औरंगपूर, मोकासबाग व पिंपळगाव- आर्वी येथील प्रत्येकी एक, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  पिंपळगाव- आर्वी येथील रुग्णाच्या संपर्कातील पाचही जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 

जुन्नर तालुक्यातील गावनिहाय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : बल्लाळवाडी- ५, उंब्रज नंबर एक- ४, निरगुडे- ३, पिंपळवंडी- ३, खानगाव- २, नारायणगाव- ४, आळेफाटा, वारूळवाडी,  उंब्रज नंबर दोन, पिंपळगाव जोगा, जुन्नर, पिंपळगाव- आर्वी, नेतवड, धनगरवाडी, उंचखडक- राजुरी, संतवाडी- आळे, बोरी बुद्रुक, धालेवाडी व शिरोलीतर्फे आळे येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS U19: ज्युनियर सेहवाग अर्धशतकापासून हुकला, अन्वय द्रविड्हचीही बॅट शांत; यशवर्धन चौहानने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं शतक

Walchandnagar News : बुलेटच्या सायलेन्सर वरुन फिरविला रोलर....; पोलिसांनी बुलेटचा फट् -फट् आवाज केला बंद...

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

SCROLL FOR NEXT