Five more persons discharged from Pimpri Chinchwad 
पुणे

मोठी बातमी : पिंपरी-चिंचवडमधील आणखी पाच जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग पाॅझिटीव्ह असलेल्या तिघांचे १४ दिवसांच्या उपचारानंतर एनआयव्हीकडील अहवाल निगेटिव्ह आलेत. त्यामुळे त्यांना शुक्रवारी (ता. २७) घरी सोडले. त्या पाठोपाठ आणखी पाच जणांचे सलग दोन दिवस घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही आज रविवारी घरी सोडले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, पुढील १४ दिवस घरीच थांबा, असे त्यांना सांगितले आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. त्यामुळे शहरातील १२ पैकी आठ जण बरे होऊन घरी पोचले आहेत. शहरासाठी ही समाधानाची बाब आहे.

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...

दरम्यान, गेल्या आठ दिवसांत एकही पाॅझिटीव्ह आढळलेले नाही. सर्वेलीयन पथकाद्वारे परदेशातून आलेले व होम क्वाॅरनटाईन केलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. गेल्या आठ दिवसांत तपासण्यात आलेल्या सर्वांचे अहवाल  निगेटीव्ह आलेले असले तरी, त्यांना, घरीच थांबा असे आदेश दिलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT