Corona-patient 
पुणे

सासवडला कोरोनानं घेरलं; रुग्णांची संख्या वाढतेय

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) - पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात एक 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा  कोरोनाने मृत्यू झाल्यापाठोपाठ आज एकाच दिवसात सासवडमधील तब्बल पाच जण कोरोना पाॅझीटिव्ह सापडले आहेत. एकट्या सासवडची रुग्ण संख्या त्यामुळे तब्बल 10 वर आणि तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 26 वर पोचली आहे. पुण्याजवळ सासवड असल्याने व रोज शेकडो लोक ये-  जा करीत असल्याने सासवड शहरातील संसर्ग रोखणे; हे एक आव्हान होऊन बसणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी माहिती दिली की; आज सासवडच्या ज्येष्ठ महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला, तर नवे पाचजण पाॅझीटिव्ह रुग्ण सापडले. त्यातील चारजण मंडई भागातील मृत महिलेच्या हाय रिस्क संपर्कातील आहेत. गावठाणात दुकान असलेला एक कापड व्यावसायिक सोनोरी रोडला राहणारा पाॅझीटिव्ह रुग्ण ठरला आहे. त्यातूनच पुरंदर तालुक्यातील कोरोनाबाधीत मृतांची संख्या तीन झाली आहे. तर तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 26 आणि सासवड 10 वर पोचले आहे.

पुरंदर तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या मागिल चार दिवसांपूर्वीच 18  होती; ती आज 26 वर पोचली. यातील 15 रुग्ण केवळ या दिड आठवड्यात सापडले. म्हणजे संसर्गाचा वेग येथेही वाढला. ही चिंताजनक बाब प्रशासन व नागरीकांना शिस्त शिकविणारी नक्कीच आहे; असे  जाणकारांनी स्पष्ट बोलून दाखविले. 26 रुग्णांमधून तीन मृत्यू व 15 जण उपचारात वा देखरेखीत आहेत. आठजण बरे झाले आहेत.  मुंबई व पुणे कनेक्शनमधून बहुतेक कोरोनाबाधीत रुग्णांची बेरीज वाढली आहे. त्यातूनच पुरंदरची धाकधूक दिवसेंदिवस वाढत आहे. अजूनपर्यंत हे मुंबई व पुण्याचे जाणे येणे थांबले नाही. त्यातूनच संसर्ग वाढण्यास वातावरण पोषक आहे. प्रशासनामार्फत काही नियंत्रण न आणल्यास बाब गंभीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT