Mumbai_High_Court 
पुणे

'डीएसके' प्रकल्पातील फ्लॅटधारक मुंबई हायकोर्टाच्या दारात; 'ही' याचिका केली दाखल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सदनिकेची 80 टक्‍क्‍यांहून अधिक रक्कम देऊनही अद्याप ताबा न मिळाल्याने भाड्याच्या घरात रहायला लागत आहे. असे असताना बँकांकडून हप्ता वसुली सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत सदनिकांचा ताबा मिळत नाही तोपर्यंत हप्ता आकारू नये, अशी मागणी करणारी याचिका बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या प्रकल्पात घर घेणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

किरकीटवाडी येथे सुरू असलेल्या 'आनंदघन' गृहप्रकल्पमधील सदनिकाधारकांनी ऍड. नीला गोखले यांच्या माध्यमातून 'डीएसकेडीएल' कंपनी, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि 25 बँकांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 
'डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स' आणि 'डीएसके ग्लोबल एज्युकेशन रिसर्च लिमिटेड' या दोन कंपन्यांच्या माध्यमातून 12 मजल्याच्या 11 इमारती आणि 930 सदनिका असलेला हा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. 930 पैकी 426 ग्राहकांनी करारनामा करून तर 34 सदनिकाधारकांना अलॉटमेंट लेटर देण्यात आले आहे. असे एकूण 460 लोकांनी येथे घर घेतले.

या प्रकल्पात घर घेण्यासाठी विविध प्रकारच्या 25 वित्तीय संस्थांनी गृहकर्ज दिले आहे. कराराप्रमाणे डिसेंबर 2016 मध्ये प्रकल्प पूर्ण होऊन त्याचा ताबा मिळणे अपेक्षित होते. मात्र 2016 पासून बांधकाम पूर्णपणे ठप्प असून आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. घराचा ताबा कधी मिळेल याची शाश्वती नसतानाही सर्व बँकांनी हप्ते वसुली चालूच ठेवली आहे. याबाबत रेराकडे तक्रार दाखल आहे. मात्र त्यावर अद्याप कडक कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रकल्प रेराने ताब्यात घेऊन दुसऱ्या बिल्डरकडून प्रकल्प पूर्ण करून द्यावा. जोपर्यंत बांधकाम पूर्ण होऊन ग्राहकांना सदनिकांचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत बँकांनी हप्ते वसूल करू नये, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

आधी घर पैसे नंतर 
काही फ्लॅटधारकांनी डीएसके यांनी सादर केलेल्या 'आधी घर पैसे नंतर' या योजनेत घर घेतले होते. त्यानुसार केलेल्या करारामधील अटीनुसार घराचा ताबा मिळाल्यानंतर ग्राहकांचे बँक हप्ते चालू होणार होते. तर ताबा मिळण्यापूर्वीचे सर्व हप्ते डीएसके देणार होते. मात्र त्या अटींचे पालन न करता बँकांनी ग्राहकांकडून हप्ते वसूल करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकारणात दाखल आहे, अशी माहिती ऍड. गोखले यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT