well 
पुणे

विहीर नव्हे शेतकऱ्याचे नशीबच गाडले...   

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, कळंब, लौकी परिसरात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. लौकी येथे पुराच्या पाण्याने विहीर गाडून गेली असून, शेतीमालाचे नुकसान झाले आहे.

लौकी येथे गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर एक ते दीड तास मुसळधार पाऊस होत आहे. दरेकरवस्ती येथील शेतकरी सोनाजी किसन थोरात यांनी नवीन विहिरीची खोदाई केली होती. सभोवती सिमेंटचे बांधकाम करण्याचे काम चालू होते. मात्र, मोठा पाऊस होऊन अचानकपणे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पूर्णत्वास आलेली विहीर कोसळून पूर्णपणे गाडली गेली आहे. 

तसेच, विहीरीत असलेली पाच अश्वक्षमतेची विद्युत मोटार व पाईपही गाडले आहेत. त्यांनी बॅंकेतून कर्ज काढून विहिरीचे खोदकाम केले आहे. त्यांचे चार लाख ५० हजार रुपये नुकसान झाले आहे. तलाठी एस. बी. बोदडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रसंगी सरपंच संदेश थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

     
चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, कळंब, चांडोली बुद्रूक, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, नांदुर आदी गावांत झालेल्या पावसाने मका, बाजरी, ज्वारी पिके जमीनदोस्त केली असून, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोमॅटो पिकावर रोगराई वाढली आहे. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकशाही असावी तर अशी! “मत देणार नाही” म्हणणाऱ्या तरुणाला इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी दिलं असं उत्तर की विरोधकही झाले फॅन! Viral Video

Pune News: ‘जलजीवन’चे काम रखडल्याने टंचाईच्या झळा; मेदनकरवाडीकर तहानेने व्याकूळ, खासगी ४०० टँकरचा पाणीपुरवठा अपुरा!

सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मराठी अभिनेत्रीवर आली हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ! "अजून वर्षही नाही झालं आणि.. "

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

SCROLL FOR NEXT