पुणे

गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजार सुरू, पण...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजार शेतकरी आणि अडत्यांच्या मागणीनुसार तब्बल 90 दिवसांनी सुरू केला आहे. बाजारात पहिल्या दिवशी नेहमीच्या तुलनेत केवळ 5 टक्केच अवक झाली आहे. तसेच फुलांना खरेदीसाठी अपेक्षित ग्राहक नाही. परंतु पुढील आठ दिवसात बाजार सुरूळीत सुरू होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

फुलबाजार सकाळी 7 दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचे उपाय घेण्यात आलेले आहेत. येथे केवळ घाऊक विक्री होणार असून, किरकोळ विक्रीला परवानगी नाही. बाधित क्षेत्रातील लोकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासक बी जे. देशमुख यांनी सांगितले.

शेतकरी, हमाल, कामगार, अडते यांनी विनंती केल्यानंतर प्रशासक देशमुख यांनी बाजार सुरू केला आहे. इतर विभागाच्या तुलनेत फुल विभागात जागा खूपच कमी आहे. त्यामुळे बाजार सुरू करण्यास वेळ लागला. अद्याप मालाला अपेक्षित उठाव नाही. मुंबई, पनवेल, कल्याण , ठाणे आणि महाड येथील बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच बाजार सुरळीतपणे सुरू होईल असे अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

देशमुख म्हणाले, बाजारात पहिल्या दिवशी सुमारे पाच ते सहा हजार किलो फुलांची आवक झाली. हळूहळू आवकमध्ये वाढ होईल. बाजारात सामाजिक अंतर पाळले जात आहे. गर्दी होऊ दिली जात नाही. बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे थर्मलने तापमान मोजले जात असून, सॅनिटायझर केले जात आहे. खबरदरीच्या सर्व योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.

जीवनावश्‍यक वस्तु नसल्याने फुलांचा बाजार दीर्घकाळ बंद ठेवण्यात आला होता. परंतु, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शेतकऱ्यांना उत्पादीत केलेल्या फुलांना बाजारपेठ हवी आहे. ग्राहकांनाही फुले हवे आहेत. याचा विचार करून आडते असोसिएशनशी चर्चा करून बाजार सुरू केला आहे.-बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT