लावणी कलावंत (डावीकडून) माया खुटेगावकर, संगीता लाखे आणि अर्चना जावळेकर. 
पुणे

नऊ महिन्यांच्या खंडानंतर ठसकेबाज लावणी आणि ढोलकीचा नाद घुमणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूर्वी लावणीला चांगले दिवस नव्हते. आता चांगले दिवस आले, तर लोकांची ‘टेस्ट’ बदलली आहे. त्यामुळे पारंपरिक लावण्या कार्यक्रमातून कमी होऊ लागल्या आहेत. या लावण्या जिवंत राहण्यासाठी आम्ही कलाकार प्रयत्न करीत आहोतच; पण त्याला राजाश्रय मिळाला तर पुन्हा पारंपरिक लावणीला बहर येईल, अशी भावना लावणी कलावंतांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे सांस्कृतिक क्षेत्र ठप्प झाले. त्याला लावणी देखील अपवाद नव्हती. आता नऊ महिन्यांच्या खंडानंतर पुण्यात ठसकेबाज लावणी आणि ढोलकीचा नाद घुमणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लावणी कलावंत माया खुटेगावकर, संगीता लाखे आणि अर्चना जावळेकर यांनी ‘सकाळ’ला भेट दिली. कलावंतांचे कोरोना काळातील हाल, लावणीचे भवितव्य आणि सरकारची भूमिका यावरही त्यांनी भाष्य केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खुटेगावकर म्हणाल्या, ‘लॉकडाउन काळात आम्हा कलावंताचे खूप हाल झाले. या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. सरकारने मानधन द्यायला हवे होते. आता सर्व व्यवहार सुरू होऊ लागले आहेत. खुल्या वातावरणात लावणी सादर करण्यासाठीदेखील राज्य सरकारने परवानगी द्यायला हवी; अन्यथा आम्हा कलावंतांच्या रोजच्या गरजा देखील भागविता येणार नाहीत.’

लग्न किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने लावणीचे कार्यक्रम होत, ते बंद असल्याने व्यवसाय अडचणीत आल्याचे सांगताना जावळेकर म्हणाल्या, ‘लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सादरीकरण होते. किमान आतातरी लावणीचे कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, तरच आम्हाला पैसे मिळतील.’’

संगीता लाखे म्हणाल्या, ‘लावणीचे कार्यक्रम कुटुंबासाठी देखील झाले पाहिजेत. त्यासाठी खुल्या सादरीकरणावरील बंदी उठविली पाहिजे. लावणीला लोकांबरोबर सरकारकडून आश्रय मिळण्याची गरज आहे.’

शनिवारी लावणीचा ठसका
तब्बल नऊ महिन्यांच्या खंडानंतर पुण्यात लावणीचा कार्यक्रम होणार आहे. ‘अहो नादच खुळा’ या कार्यक्रमाद्वारे त्याची सुरुवात होत आहे. येत्या शनिवारी (ता. २) दुपारी साडेबारा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणीचा कार्यक्रम होत आहे. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद येथेही हे कार्यक्रम होणार असल्याचे खुटेगावकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT