Footpath-Encroachment
Footpath-Encroachment 
पुणे

विक्रेत्यांनी बळकावला पदपथ

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - अवघा अडीच फुटांचा पदपथ आणि तोही फेरीवाल्यांनी बळकावला. ४० फुटी रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी हातगाडीसमोरच वाहने पार्क केलेली, यामुळे आधीच अरुंद असलेला वाकडमधील दत्त मंदिर रस्ता आणखीन अरुंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालायचे कसे आणि वाहन चालवायचे कसे, असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे.

वाकड चौक ते डांगे चौक रस्ता हा वाकड-दत्त मंदिर रस्ता विकास आराखड्यात ४५ मीटरचा असून, प्रत्यक्षात तो २४ मीटरचा विकसित केला आहे. काही ठिकाणी तो २० मीटरचा आहे. हा रस्ता पूर्ण रिकामा असेल तर एकावेळी एका लेनमधून दोन अवजड वाहने जाऊ शकतात. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एक वाहन कसेतरी जाते. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे.

दत्त मंदिर या रस्त्यावर दुतर्फा अवघा अडीच फुटांचा पदपथ आहे. त्यावर गॅरेज, चप्पल, गादी, उसाचे गुऱ्हाळ, भाजी, खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना गर्दीतून चालावे लागते.

हॉकर्स झोनचे स्वरूप
वाकड चौक ते डांगे चौकदरम्यान फेरीवाल्यांनी पदपथालगतच्या रस्त्यावर हातगाड्या लावल्या आहेत. १२७ हातगाड्या या मार्गावर असल्याने परिसराला हॉकर्स झोनचे स्वरूप आले आहे. सायंकाळी आयटी कंपन्या सुटल्यावर रहदारी वाढते. त्यामुळे कोंडीत भर पडते. 

पदपथ खुला करावा
दत्त मंदिर रस्ता २४ मीटरचा असून, अतिक्रमणांमुळे तो १० मीटरसुद्धा वापरासाठी राहत नाही. त्यामुळे महापालिकेने येथील पदपथ पादचाऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणी सुधीर देशमुख यांनी केली आहे. 

दत्त मंदिर रस्ता ४५ मीटर करण्यासाठी काही जागा पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. मात्र, तेथे अतिक्रमण झाले आहे. काही दिवसांत पदपथावर अतिक्रमण विरोधी कारवाई करून जागा ताब्यात घेणार आहे.
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT