Taljai Hill
Taljai Hill Sakal
पुणे

परदेशी तण उच्चाटनाची मोहीम; तळजाई टेकडीवर प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - परदेशी तणांमुळे शहर व परिसरातील वनराई, हरित क्षेत्र कमी होत आहे. याचा परिणाम या वनराईवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर होत असल्यामुळे विविध पर्यावरण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हरित चळवळ मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तळजाई टेकडीवरील ‘कॉसमॉस सल्फ्यूरीयस’ (सोनकुसुम) या परदेशी तणाला काढले.

या मोहिमेत मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि), बायोस्फिअर्स, अॅडव्हेंचर फाउंडेशन, पर्यावरण व उद्यान कक्ष, पुणे महापालिका, वनविभागाच्या विविध विभागाचे प्रतिनिधी, एरिया सभा असोसिएशन ऑफ पुणे, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान आदी संस्थांनी सहभाग घेतला होता. माबिच्या माध्यमातून तणमुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेशदेखील जनमानसात रूढ करावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. याचे संयोजन डॉ. सचिन पुणेकर, विवेक देशपांडे, दत्तात्रेय गायकवाड, गणेश मानकर, सत्या नटराजन आदींनी केले होते.

याबाबत डॉ. पुणेकर म्हणाले, ‘‘कॉसमॉस या परदेशी तणाचा शहरांमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, गवताळ कुरणांवर सध्या मोठ्या प्रमाणात पिवळ्या-केशरी फुलांचा बहर आला आहे. या तणाची व्याप्ती मोठी असल्याने स्थानिक जैवसाखळीदेखील नष्ट होत आहे. मधमाशी, भुंगे, फुलपाखरे आता मोठ्या प्रमाणात याचे परागकण गोळा करतात. त्याचा परिणाम स्थानिक वनस्पतींच्या परागीभवनावर होत आहे. तसेच, स्थानिक गवताच्या व अन्य वनस्पतींच्या जाती-प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. त्यामुळे या वनस्पतीचा फैलाव रोखण्यासाठी याला काढण्यात येत असून, या चळवळीच्या माध्यमातून ‘तणमुक्त भारत- स्वच्छ भारत’ ही जनजागृती करत आहोत.’’

कॉसमॉसविषयी

  • ही वनस्पती मूळची मेक्सिकोमधील

  • सूर्यफुलाच्या कुळातील या वनस्पतीच्या वाढण्याचा वेग अधिक

  • कमी पाण्यावर, अगदी ओसाड जमिनीतदेखील तग धरू शकते

  • या वनस्पतीचा बीजप्रसार थोड्या कालावधीत सर्वदूर होतो

  • या वनस्पतीवर कुठलेच नैसर्गिक नियंत्रण नसल्यामुळे ती मोठ्या प्रमाणात फोफावते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT