DSK Sakal
पुणे

उलाढालीची गुंतागुंत स्पष्ट करणारा रिपोर्ट न्यायालयात सादर

डीएसके प्रकरण, सुमारे एक हजार पानांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी ठेवीदारांकडून तसेच त्यांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांचे काय केले? आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा झाला? पैशांची हेराफेरी कधी व कशी झाली? त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले? याची इतंभूत माहिती देणारा. तसेच या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट अखेर पुणे पोलिसांनी आज न्यायालयात सादर केला आहे. हा रिपोर्ट सुमारे एक हजार पानांचा आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. सुमारे अडीच वर्षांच्या विलंबाने हा रिपोर्ट पोलिसांनी सादर केला आहे. (Pune News)

रिपोर्ट बनविण्यासाठी दोन डिसेंबर २०१७ रोजी मुंबईतील डी. जी. ठकरार ऍण्ड असोसिएटसची नियुक्ती करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगाने ऑडिट करण्याचे काम या त्यांना देण्यात आले आहे. रिपोर्ट सादर न झाल्याने बचाव पक्षाकडून त्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन न्यायाधीशांनी पोलिसांनी निर्देश दिले होते की, एका महिन्यात रिपोर्ट न्यायालयात दाखल करावा. त्यावर तपास अधिका-यांनी ११ मार्च २०१९ रोजी एका महिन्यात अंतरिम रिपोर्ट देवू, असे न्यायालयास सांगितले होते. मात्र अद्यापही तो सादर करण्याबाबतचा आलेले नव्हता.

काय असतो फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट?

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस किंवा वकील तज्ज्ञ असतातच असे नाही. त्यामुळे अशा गुन्ह्यांची कुंडली काढण्यासाठी सरकारी मान्यता असलेल्या सीए फर्मची नियुक्ती केली जाते. ही फर्म निष्पक्षपणे गुन्ह्यातील कंपनीचे ऑडिट करते. ठेवीदारांची फसवणूक कशी झाली हे त्याआधारे समजते. त्यामुळे फर्मने सादर केलेला अहवाल हा महत्त्वाचा पुरावा असतो.

खटल्यावर काय परिणाम होणार?

रिपोर्टमधून आलेल्या निष्कर्षांवर गुन्हा कसा घडला व त्याची व्याप्ती स्पष्ट होत असते. त्यामुळे रिपोर्ट दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाला आपली बाजू आणखी प्रभावीपणे मांडता येते. फसवणूक झाल्याचे त्यातून उघड झाले तर गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : आक्रमक राजकारणाला काहीही स्थान नाही - शायना एनसी

SCROLL FOR NEXT