पुणे

तळजाई टेकडीवर वनसंधारणाचे कार्य सुरू; पुणे वन विभागाने दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पावसाळा आला की तळजाई परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी पाणी जमिनीतच मुरावे, यासाठी जलसंधारणाची कामे करण्यात येत आहे. तसेच तेथील परिसंस्थेला निरुपयोगी असलेली गिरीपुष्प (ग्लिरिसिडीया) ही झाडे काढून देशी वृक्षांची लागवड केली जात आहे, अशी माहिती पुणे वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तळजाई टेकडीवर चालू असलेल्या विविध कामांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. वनसंधारणाच्या दृष्टीने ही सर्व कामे चालू असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पुराच्या परिस्थितीमुळे नागरिकांची मोठी असुविधा होते.

तसेच जीवितहानीची समस्यादेखील गंभीर असल्यामुळे याबाबत वन विभागाला उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास प्रतिसाद देत आम्ही टेकडी परिसराची निरीक्षणे केली असून आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करत आहोत.’’ ही सर्व कामे नागरिकांना होत असलेल्या असुविधेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. त्यामुळे टेकडी परिसरातील रहिवाश्यांनी याबाबतचे संभ्रम दूर करावे असे आवाहन वन विभागाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT