Former BJP MLA Yogesh Tillekar and 41 others granted bail 
पुणे

भाजपच्या पुण्यातील माजी आमदार व चार नगरसेवकांसह 41 जणांना जामीन

सकाळवृत्तसेवा

पुणे : नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी करत महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि चार नगरसेवकांसह 41 जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

याप्रकरणी संबंधितांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी आमदार टिळेकर यांच्यासह सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, ऋषाली कामठे, वीरसेन जगताप अशी अटक झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी कार्यकारी अभियंता अषित देवप्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीतर्फे ऍड. सुधीर शहा, ऍड. के. टी. आरु, ऍड. शैलेश म्हस्के,  ऍड. प्रसाद कुलकर्णी, ऍड. रवी लाढाणे, ऍड. ऋषिकेश घोरपडे, ऍड. सिद्धार्थ राठोड यांनी कोर्टात कामकाज पाहिले. या प्रकरणात संबंधितांना जामिनावर सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

आता गुन्हेगारांचं काही खरं नाही; पोलिस आयुक्तांनी केलाय मोठा निर्धार!

कात्रज- कोंढवा रस्ता, बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या स्वारगेट येथील कार्यालयात आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकर यांनी फिर्यादी यांच्या टेबलावरील काच फोडली व कार्यालयातील फाइल फेकून दिल्या. तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची नुकसान करून काचा फोडल्या. त्यानंतर टिळेकर यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून येत त्यांना दमदाटी करून ढकलत कार्यालयाबाहेर काढत सरकारी कामात अडथळा आणला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT