Former MLA of Bhor Sampatrao Jedhe passed away 
पुणे

भोरचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे निधन

विजय जाधव

भोर : भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संपतराव जेधे (वय.८२) यांचे मंगळवारी (ता.१५) पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. आंबवडे (ता.भोर) येथील त्यांच्या घरात मंडळवारी पहाटे पावणसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. १९७८ साली अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते.

गांधी टोपी, अंगरखा व धोतर आणि धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले आमदार म्हणून त्यांची ओळख होती. आंबवडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दस सुरुवात केली. त्यानंतर भोर पंचायत समितीचे सभापतीपदानंतर ते आमदारपदी विराजमान झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते उपाध्यक्षदेखील होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते जवळचे मानले जात होते. संपतराव जेधे यांचे अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी भोर तालुक्याची अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राची ओळख राज्याला करून दिली.

४० वर्षांपूर्वी त्यांनी रायरेश्वर दिंडीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वरवरून ते रायरेश्वर दिंडीतून पायी पंढरपूरला जात होते. पंढरपूर येथील राज्य शासनाच्या पंढरपूर देवस्थान समितीचे ते १० वर्षे विश्वस्त होते. पंढरपूर व आळंदी येथील भक्तनिवास उभारणीसाठी त्यांचे योगदान होते. कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, शिरथरघळ (ता.महाड, जि.सातारा) येथील ट्रस्टचे अध्यक्ष होते. तालुक्यातील व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणीक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त केले.
 
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशअर्जास मुदतवाढ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT