gore_mohite 
पुणे

भामा आसखेड आंदोलनाबाबत माजी आमदार सुरेश गोरे यांचे धक्कादायक आरोप 

रुपेश बुट्टे

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यात सत्ता बदल झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांच्या विरोधात भूमिका घेत आहेत, हे योग्य नाही. जनतेच्या मागे उभे राहणे, हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींनी आंदोलकांवर एजंट म्हणून आरोप करणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करून विरोध करतो. भामा आसखेड आंदोलन आमदारांनी जाणीवपूर्वक चिघळविले आहे, असा आरोप खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता केली. 

भामा आसखेड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुरेश गोरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधींची पालकमंत्र्यांकडे यांची मध्यस्थी फेल ठरली आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत काम बंद करा आणि कारवाई केलेल्या प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घ्या. बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी मी मागील पाच वर्षात काम केले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, बहुतांश प्रश्न मार्गी लावले. माझ्या काळात भामा आसखेड विषयाशिवाय अधिवेशन संपले, असे कधी झाले नाही. सुरुवातीला जलवाहिनी काम शिवसेनेनेच बंद पाडले होते. सर्वानुमते एक किलोमीटर जलवाहिनी काम बंद ठेवावे, असे ठरले होते. आम्ही आजही शेतकऱ्यांसमवेत आहे. 

खरंच एजंट असणाऱ्यांची चौकशी करा, पण बाकी शेतकऱ्यांना तरी न्याय द्या, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना एजंट म्हणणारेसुद्धा त्याच माळेचे मणी असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे. जमीन उपलब्ध असताना प्रशासन दिशाभूल करून जमीन उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. माझ्या काळात आंदोलकांवर कारवाई केली नाही. कोणावरही चुकीचा गुन्हा दाखल झाला नाही. परंतु, हे लोकप्रतिनिधी आल्यापासून आंदोलन चिघळून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असे गोरे म्हणाले.

पुण्यात न्यायालयीन कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये
 
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो, अशी आमची अपेक्षा होती, परंतु तालुक्यात याबाबत भ्रमनिरास झाला आहे. परंतु, आम्ही आंदोलकांबरोबर आहोत. आम्ही गप्प बसणार नाही. हिम्मत असेल तर एजंटांची चौकशी करा. त्यात यांना काही मिळत नाही म्हणून एजंटाच्या नावाने बोलतात.

या वेळी माजी तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, लक्ष्मण जाधव, भगवान पोखरकर आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशा

SCROLL FOR NEXT