Vinayak Nimhan passed away 
पुणे

Pune: माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

बाबा तारे

पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार (ता. २६) रोजी निधन झाले. निम्हण हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा ते कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर कोथरूड मतदार संघाचे विभाजन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघात देखील आमदारकी भूषविली होती. निम्हण हे राजकारणामधील एक बडे प्रस्थ होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निम्हण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठे करण्याची त्यांची खुबी होती. निम्हण यानी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करून आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आमदारकी पर्यंत पोहोचले होते. विनायक निम्हण हे कोथरूड मतदारसंघातून दोन वेळेस (१९९९ ते २००९) शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर त्यानी नारायण राणे यांच्या बरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश करुन शिवाजीनगर मतदार संघामध्ये (२००९ ते १०१४) काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निडून आले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण व दोन मुली, दोन भाऊ, एक बहिण,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT