former mla yogesh tilekar corporator rani bhosale arrested along with 41 party workers 
पुणे

पुणे : माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका राणी भोसलेंसह 41 जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेविका मनिषा कदम, वृषाली कामठे यांच्यासह 41 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. काम रोखणे, अधिकारी- कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, अशा राजकीय नेत्यांच्या भूमिकेविरोधात महापालिकेने आता कटोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यातून टिळेकरांवर ही कारवाई करण्यात आली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अटक झाली!
पाणी पुरवठा सुरळीत होणे हे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची प्राथमिक मागणी असते. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना सातत्याने वेठीस धरलं जातं. नगरसेवकही महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांवर वेळप्रसंगी दादागिरी करून पाणी पुरवठा सुरुळीत होईल, याकडे लक्ष देतात. पुण्यात असे अनेक प्रसंग यापूर्वीही घडले आहेत. पण, माजी आमदार, नगरसेवकांसह 41 जणांना अटक होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय घडले? 
कात्रज-कोंढवा रस्ता बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी हे आंदोलन केले होते. महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत आठवड्यातून एक दिवस काही भागातील पाणी पुरवठा बंद केला जातो. या जल केंद्रातून गेली २ वर्षे ही पाणी कपात करण्यात येत आहे. ही पाणी कपात बंद करून १ ऑक्टोबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले होते. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने टिळेकर आणि त्याभागातील नगरसेवकांनी स्वारगेट येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांना जाब विचारला. तेव्हा जाधव आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. तसेच ऑफिसची तोडफोड करण्यात आली. याबाबत महापालिकेने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT