Sharad-Pawar-Raju-Shetty
Sharad-Pawar-Raju-Shetty 
पुणे

ना भाजप, ना सेना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच आघाडी पुन्हा : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्यांसोबतच वंचित घटकांना घेऊन राज्यातील 17 पक्ष आणि संघटनांची मूठ बांधून प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना केली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रजा लोकशाही परिषद ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

येथील विश्रामगृहात शनिवारी (ता. 14) शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ओबीसी, बारा बलुतेदार, भटके-विमुक्त, बहुजन मुक्ती पार्टी, बळीराजा पार्टी, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अशा विविध वंचित घटकांमधील 17 पक्ष-संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना करण्यात आली. 

शेट्टी म्हणाले, 'ही परिषद केवळ निवडणुकीपुरती नव्हे; तर यापुढेही एकत्रित काम करेल. विधानसभा निवडणुकीत वंचित घटकांची ताकद दाखवून देऊ. कोणत्या गट-तटांमध्ये आम्हाला रस नाही; तर जातीयवादी शक्‍तींच्या विरोधात लढायचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महाजनादेश यात्रेत किती शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त केले, याबाबत माहिती द्यावी.' 

आघाडीसाठी जागांचा आग्रह नाही 
मुंबईत 19 सप्टेंबर रोजी 26 छोट्या-मोठ्या पक्ष-संघटनांची बैठक बोलावली आहे. आघाडीचा धर्म पाळायचा असल्यास जागांबाबत संख्येचा आग्रह नाही. आम्ही त्याबाबत लवचिक आहोत; परंतु सक्षम उमेदवार देऊन भाजप-सेनेचा पराभव झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी पुण्यात प्रजा लोकशाही परिषदेच्या मेळावा होणार आहे. 

आयातीमुळे कांद्याचे भाव पडतील 
केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. याबाबत शेट्टी म्हणाले, 'कांद्याला प्रतिकिलो 50 पैसे भाव असताना सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. कांद्याचा भाव 39 रुपये रुपये किलो झाला. परंतु शेतकऱ्यांच्या हातात 23 रुपयेच पडतात. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. पाकिस्तान किंवा कोणत्याही देशातून कांदा आयात केल्यास कांद्याचे भाव पडतील.' 

...तर महापुराचे नुकसान टळले असते 
शेट्टी म्हणाले, की जलसंपदा विभागाने वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. अतिवृष्टीच्या वेळी जलसंपदा विभाग काय करीत होता? जल आयोगाने योग्य निर्णय घेतले असते, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेले हजारो कोटींचे नुकसान टाळता आले असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT