Former MP Vijaysinha Mohite Patil says i am still in NCP  
पुणे

आता मोहिते पाटील म्हणतात, 'मी अजूनही राष्ट्रवादीतच'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'मी अजूनही राष्ट्रवादीतच आहे. या कार्यक्रमापूर्वी पवारसाहेबांना तीन वेळा भेटलो. मी पक्षांतर केलेले नाही.' असे स्पष्टीकरण माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज पुण्यात दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच त्यांनी असे स्पष्टीकरण का दिले, याचीही चर्चा होत आहे. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर अकलूजचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपण अद्यापही राष्ट्रवादीमध्येच असल्याचे सांगितले. 

विजयसिंह मोहिते पाटलांच्या मुलाने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूकीत भाजप उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. पण आज या सार्वजनिक कार्यक्रमात शरद पवारांसोबत चर्चा करताना ते दिसले. पवारांना या कार्यक्रमापूर्वी मी 3 वेळा भेटलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT