Untitled-2.jpg 
पुणे

हिंसाचारविरोधी पंधरवड्यातही महिलांवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यातच भारतात उन्नाव आणि हैदराबाद येथे महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या आहेत. शिवाय आजही भारतात दररोज महिलांवर अत्याचार होत असल्याची खंत महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक
कार्यकर्त्या ऍड. फ्लेव्हिया ऍग्नेस यांनी शनिवारी येथे व्यक्त
केली. 

पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या यंत्रणांची गरज आहे. ती जबाबदारी सरकारची असून स्वयंसेवी संस्थांची नव्हे. पण दुदैवाने सध्या नेमके याच्या उलट स्थिती असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

इंटरनॅशनल लॉंजिव्हिटी सेंटर इंडियाच्यावतीने (आयएलसीआय) दिल्या जाणारा पहिला अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार शनिवारी पुण्यात ऍड. फ्लेव्हिया ऍग्नेस
यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी "आयएलसीआय'चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, चेअरमन जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती आणि संस्थेच्या
कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते.

फ्लेव्हिया म्हणाल्या, ''महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या किंवा जिवंत जाळण्याच्या भीषण घटना उघडकीस आल्यानंतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन एका रात्रीत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जाते. मात्र, महिलांवरील हिंसाचाराविरोधात केलेल्या कायद्याच्या
अंमलबजावणीची कोणालाच फिकीर नसते.आपल्याला केवळ सेन्सेशनल तोडगे हवे आहेत, पण न्यायव्यवस्था दररोज का कार्यरत नाही, पोलिस फिर्याद का नोंदवीत नाहीत, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची किती घुसमट होते, या प्रश्नांची उत्तरे आपण मागत नाही, हे दुर्दैव आहे.''

डॉ. माशेलकर म्हणाले, ''हा पारितोषिक समारंभ नाही, तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. जी व्यक्ती प्रेरणा म्हणून जगत आहे, त्यांना हे पारितोषिक देण्यात येत आहे.'' दरम्यान, याच समारंभात आधार ज्येष्ठ नागरिक संस्था मिरज (जिल्हा सांगली), ज्येष्ठ नागरिक संघ, डीएसके विश्व पुणे, कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक
संघ रत्नागिरी या ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांना कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने, तर डॉ. नामदेवराव बेहरे (वर्धा), पांडुरंग बोराटे (बारामती) आणि डॉ. प्रमोद मोघे (पुणे) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले. उमराणीकर यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT