court
court 
पुणे

जिल्हा न्यायालयातील कामकाज चारच तास; ५० टक्केच कर्मचारी राहणार उपस्थित

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयीत कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार उद्यापासून (ता.७) येथील जिल्हा न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये चारच तास सुरू राहणार आहे. या काळात ५० टक्केच कर्मचारी उपस्थित असणार आहे. या वेळेत केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवरच सुनावणी होणार आहे. तसेच वीकएंड लॉकडाऊनमुळे प्रत्येक शनिवारी न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र त्या दिवशी फक्त रिमांडवर सुनावणी होणार आहे. नुकतीच न्यायालयीन कामकाजाची वेळ वाढविण्यात आली होती. त्यानुसार सध्या न्यायालयामध्ये अडीच तासाच्या दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू आहे. मात्र आता उद्यापासून (ता.७) अडीच तासांऐवजी दोन तासांची शिफ्ट करण्यात आली आहे. याकाळात केवळ महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी होणार आहे. तसेच त्याच खटल्यातील पक्षकार, वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत.

असे होणार कामकाज :

  • - सुनावणी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यावर भर
  • - वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी यांच्या गैरहजेरीत विरोधात आदेश होणार नाही
  • - न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनमध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहील
  • - दैनंदिन बोर्डावर मोजक्याच तारखांचा उल्लेख असणार
  • - बोर्डावर उल्लेख असलेल्या खटल्यांचेच कामकाज त्या दिवशी होणार

कौटुंबिक न्यायालयाची देखील वेळ झाली कमी :
कौटुंबिक न्यायालयातील कामकाज देखील सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये ५० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू राहणार आहे. यावेळी कोणताही विरोधात आदेश दिला जाणार नाही. गरज असेल तरच पक्षकार, वकीलांनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी माहिती ‘दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन’च्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.


विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून तारीख व महत्त्वाचे काम असणा-या वकील-पक्षकारांना न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळावी. तसेच सर्वांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर तत्काळ न्यायालयाच्या बाहेर पडावे, असे आवाहन आम्ही करतो.
- अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT