Four lakh seventy five thousand fraud with senior citizen by pretending to update the paytm 
पुणे

पेटीएम अपडेट करण्याचे सांगून ज्येष्ठाला पावणेचार लाखांचा गंडा

सकाळवृत्तसेवा

पुणे : पेटीएम ऍप अपडेट करायचे असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकाच्या बॅंक खात्यातून तीन लाख 75 हजार 25 रुपये लांबविल्याचे उघडकीस आले आहे. या बाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दिघीत रिक्षा टेम्पोच्या धडकेत वृद्ध पादचारी ठार

संबंधित ज्येष्ठाच्या मोबाईलवर गेल्या महिन्यात अज्ञाताने फोन केला. तुमचे पेटीएम ऍप अद्ययावत करायचे आहे. तातडीने माहिती न दिल्यास ऍप बंद पडेल, अशी भीती कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना दाखवली. त्यानंतर फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवत त्यांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने लांबविली. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून चोरट्याने त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर तपास करीत आहेत.


बहिणीशी फोनवर बोलला म्हणून 'त्याला'...

पेटीएम ऍप अद्ययावत करण्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गेल्या दीड महिन्यात 157 तक्रारी दाखल झाल्या आहेत. चोरट्यांनी बतावणी करून आत्तापर्यंत लाखो रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरल्याचे पुढे आले आहे. पेटीएम अपडेट करायचे असून माहितीसाठी त्वरित नमूद क्रमांकावर संपर्क साधावा, असे मेसेज ऍप वापरत असलेल्यांच्या मोबाईलवर पाठवले जात आहे. अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होण्याची शक्‍यता असून मोबाईलधारकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच एनी डेस्क, टिम व्ह्‌यूअर, क्विक सपोर्ट यासारखे मोबाईल ऍप डाऊनलोड करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT