पुणे

पुणे 'झेडपी’च्या चार सदस्यांचे सदस्यत्व होणार रद्द, कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे ः पुणे शहरालगतची जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३ गावे महापालिकेत समाविष्ट होत असल्याने हवेली तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदावर संक्रांत येणार आहे. या सर्व सदस्यांची पदे येत्या महिनाभरात रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्हा परिषद सदस्यांचे आणि पंचायत समिती सदस्यांचे गट आणि गण पुणे महापालिकेत समाविष्ट होत आहेत, याबाबतचा अहवाल राज्य सरकारने जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागविला आहे.

जिल्हा परिषदेने दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारला याबाबतचा अहवाल पाठविला आहे. हवेली तालुक्यातील चार जिल्हा परिषद सदस्यांची आणि हवेली पंचायत समितीच्या आठ सदस्यांची पदे रद्द होऊ शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची पदे रद्द होणार असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सदस्य संख्या कमी होणार नसून ती पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे. मात्र गट आणि गणांच्या रचनेत तालुक्या-तालुक्यातील पदांच्या संख्येत फेरबदल होणार असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या अदलाबदलीमुळे हवेली तालुक्यातील १३ गटांपैकी तीन गट आणि सहा गण कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवेली तालुक्यातील गट आणि गणांची संख्या कमी होणार असली तरी, जिल्हा परिषदेचे एकूण गट आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या मिळून असलेली गणांची संख्या पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे. यानुसार केवळ हवेली तालुक्यातील कमी झालेले गट आणि गण हे मतदारांच्या संख्येच्या प्रमाणावर अन्य तालुक्यात वाढणार आहेत. या वृत्ताला जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि सर्व पंचायत समित्यांचे मिळून १५० गण आहेत. एका जिल्हा परिषद गटात दोन गण येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गट आणि गणांची संख्या कायम राहणार आहे. गट आणि गणांची दर पाच वर्षांनी फेररचना करण्यात येते. या फेररचनेनुसार हवेली तालुक्यात २०१२ च्या निवडणुकीत १० गट आणि २० गण होते. फेररचनेनुसार २०१७ च्या निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे १३ आणि २६ इतकी झाली होती. त्यातच राज्य सरकारने शहरालगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार झेडपी सदस्य तर आठ पंचायत समिती सदस्यांची पदे रद्द होणार आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT