corona 
पुणे

जुन्नरकरांच्या चिंतेत भर, कोरोनाचे आणखी चार रुग्ण वाढले

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) :  जुन्नर तालुक्यातील तीन गावांतून बुधवारी (ता. १) कोरोनाचे एकूण चार नवीन रुग्ण आढळून आले.  नारायणगाव व उंचखडक येथे पुणे व नगर येथून येऊन गेलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे या गावांच्या चिंतेत भर पडली आहे. 

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा व खानगाव येथे प्रत्येकी एक, तर बल्लाळवाडीला दोन, असे चार रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ७२ झाली आहे. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत, तर ३८ जण उपचार घेत आहेत. औरंगपूर व मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.  कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नव्याने पाठविलेल्या ९० संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत असल्याने गावांची चिंता वाढत आहे. 

जुन्नर तालुक्यातील गावनिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :  डिंगोरे - १  (बरा), सावरगाव-  ५ (बरे), मांजरवाडी -  २ (बरे), पारुंडे - ३  (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे ), धालेवाडीतर्फे मिन्हेर - १ (बरा), विठ्ठलवाडी वडज - १ (बरा), शिरोलीतर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा) , कुरण- १ (बरा), चिंचोली- ३ (बरे), ओतूर - २ (बरे), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १(बरा), नवलेवाडी - १(बरा) , धामणखेल- १ (बरा), कुसूर- १. मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू),  मोकासबाग- १ (मृत्यू),  एक्टिव्ह :  बोरी- ३, खामुंडी- ७, खानापूर- ३, शिरोली खुर्द- ३, उंब्रज नंबर एक- १, धनगरवाडी- १, ओतूर- १, वारुळवाडी- १, विठ्ठलवाडी- १, संतवाडी- १, जुन्नर- १, निरगुडे- १, उंब्रज नंबर एक- १, उंब्रज नंबर दोन- ३, पिंपळवंडी- ३, नेतवड- १,पिंपळगाव आर्वी-१, बल्लाळवाडी- २, पिंपळगाव जोगा- १,  खानगाव- १.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Ashok Kharat भोंदुगिरीतून जमवली ५०० कोटींची मालमत्ता, नाशिकमध्ये ७० एकर जमीन; नातलगांच्या नावावरही संपत्ती

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

SCROLL FOR NEXT