वाघोली (पुणे) : वाघोलीत आज चार रुग्णांची भर पडली. तर आठ जणांना घरी सोडण्यात आले. मांजरीमध्ये दोन तर वडगाव शिंदे मध्येही एका रुग्णाची भर पडली. एकूण आकडा 94 वर पोहचला असून 60 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आजच्या बाधितांमध्ये कालच्या एका बाधित कुटुंबातील दोघे तर दोन नवीन रुग्ण आहेत. आज रुग्णापेक्षा घरी सोडणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट असल्याने आजचा दिवसही दिलासादायक ठरला.
वाघोली प्राथमिक केंद्र अंतर्गत एकूण 7 गावे आहेत. सात पैकी वडगाव शिंदे वगळता 6 गावात रुग्ण आढळून आले होते. मात्र, वडगाव शिंदे मध्येही कोरोनाचा शिरकाव अखेर झालाच. या सात गावातील रुग्णांनी शतक पार केले आहे. एकूण रुग्णांची संख्या 120 वर पोहचली असून 41 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर 76 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाघोलीतील येथील बीजेएस शैक्षणिक संकुलात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर सुरु होणार असल्याची माहिती वाघोली रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली. अधिकारी व कर्मचारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार याठिकाणी २५० रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे नियोजन असल्याचे कटके यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वाघोलीतील चार खासगी हॉस्पिटलच्या ३२४ बेडचे अधिग्रहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यानंतर बीजेएस येथे देखील २५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार होतील असे नियोजन करण्यात आले आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये होणारे उपचार खर्चिक असले तरी याठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार करणे शक्य होईल. बीजेएसमध्ये कोरोना तपासणीसाठी स्वॅब सेंटर सुरु आहे आता लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार देखील केले जाणार आहेत.
एक दोन दिवसात हे सेन्टर सुरू होईल. असे डॉ वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
गावे एकूण रुग्ण, कंसात बरे झालेले व अॅक्टिव्ह रुग्ण
1) वाघोली - एकूण रुग्ण - 94 ( बरे झालेले - 33 ) - ( अॅक्टिव्ह - 60 )
2) केसनंद - एकूण रुग्ण - 8 ( बरे झालेले - 2 ) ( अॅक्टिव्ह - 6 )
3) कोलवडी - एकूण रुग्ण - 1 ( अॅक्टिव्ह - 1 )
4) मांजरीखुर्द - एकूण रुग्ण - 11 ( बरे झालेले - 4 ) - ( अॅक्टिव्ह - 5 ) ( मृत्यू - 2 )
5) आव्हाळवाडी - एकूण रुग्ण - 2 ( अॅक्टिव्ह - 2 )
6) निरगुडी - एकूण रुग्ण - 3 ( बरे झालेले - 27 ) ( अॅक्टिव्ह - 1 )
7) वडगाव शिंदे -- एकूण रुग्ण - 1 ( अॅक्टिव्ह - 1 )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.