Four people were bitten dogs in Vimannagar Gangapuram Society pune sakal
पुणे

Pune News : एकाच सोसायटीत चौघांना श्वानदंश

विमाननगर : गंगापूरम सोसायटी येथील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : येथील सन सिटी सोसायटीत एका लहानग्याला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच आता विमाननगरमधील आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. येथील गंगापूरम सोसायटीतील चार रहिवाशांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी संतप्त रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे केले आहे.

विमाननगर येथे नव्या विमानतळ रस्त्या जवळ गंगापूरम सोसायटी आहे. येथे सोमवारी दिवसभरात चार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला. या विषयी माहिती देताना येथील रहिवासी दशरथ गद्रे म्हणाले, या सोसायटी परिसरात दहा ते पंधरा कुत्री कायम नागरिकांवर धावून जातात. मागील दोन महिन्यात सुमारे 14 लोकांना कुत्रे चावले.

त्यामुळे सोमवारी (ता २७) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संतप्त रहिवासी सोसायटीत जमले. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या श्वान पथकाशी संपर्क साधून माहिती दिली आणि भटक्या श्वानांवर कारवाईची मागणी केली.

या सोसायटीतील काही रहिवासी भटक्या कुत्र्यांना खायला देतात. त्यामुळे येथील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे, असा दावाही काही रहिवाशांनी केला. तसेच यावेळी काही श्वानप्रेमी आणि संतप्त रहिवाशी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली.

येथील रहिवासी अनुपमा शर्मा म्हणाल्या, काही कुत्री हे अचानक मागून येऊन हल्ला करतात. त्यामुळे मुलं आणि महिला खूप घाबरतात. कुत्रा चावण्याच्या भीतीमुळे लहान मुलांचे खाली येऊन खेळणे बंद झाले आहे.

येथील रहिवासी ग्रेसी कॉद्रास म्हणाल्या, अशा आक्रमक आणि चावक्या कुत्र्यांवर पुणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी. मागील दोन महिन्यात सुमारे 14 घटना घडल्या आहेत. कुत्र्याने हल्ला केलेले लहान मुलं आणि महिला आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या श्वानपथकाचे समन्वयक विजय ओवाळ म्हणाले, नसबंदी केलेले परंतु चावणारे कुत्रे असेल तर त्यांना आपण निरीक्षण गृहात ठेवतो. त्यानंतर पुन्हा जागेवर आणून सोडतो. विमाननगरच्या गंगापूरम सोसायटी येथे गाडी पाठवतो.

नगरास्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या श्वान पथकाचे शैलेश चव्हाण म्हणाले, ज्या नागरिकांना कुत्रा चावला त्यांचे आरोग्य प्रमाणपत्र सोसायटी पदाधिकाऱ्यांना मागितले आहे. त्यांनी ते प्रमाणपत्र दाखवल्यानंतर चावणारे कुत्रे पकडून त्यांना निरीक्षणगृहात ठेवू. विमाननगर भागासाठी कुत्रे पकडणारी गाडी शुक्रवारी येते. सोसायटीने फक्त तोंडी संपर्क केला आहे. मात्र अद्याप आमच्यासोबत पत्र व्यवहार केलेला नाही.

गंगापूरम सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक गिरी म्हणाले, चावणाऱ्या कुत्र्यांबाबत पुणे महानगरपालिकेशी अनेकदा संपर्क साधला. परंतु त्यांची गाडी येते. सोसायटीच्या बाहेरून गाडी फिरते आणि निघून जाते. काहीही होत नाही. काल चार लोकांना कुत्रा चावला.

श्वानप्रेमी आणि रहिवाशी वाद

विमाननगर भागातील काही श्वानप्रेमी सोसायटीत येऊन कुत्र्यांना खायला घालतात. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यास ते वाद घालतात. पोलीस तक्रारीची धमकी देतात. हा वाद टाळण्यासाठी आम्ही गप्प राहतो. कुत्रे गाड्यांचे ही नुकसान मोठ्या प्रमाणात करतात. परिसरात घाण करतात.

पुणे महानगरपालिकेला कुत्रे पकडण्याची विनंती केली तरी ते शॉनप्रेमींची भीती दाखवतात. ज्यांना कुत्रा चावला त्यांची चुकी असेल अशी भूमिका हे प्राणी प्रेमी मंडळी घेतात, असा दावा जमलेल्या रहिवाशांनी केला.

त्यामुळे प्राणी प्रेमी आणि त्रस्त रहिवासी यांच्यात कायमच वाद झडत आहेत. वडगाव शेरी येथे सन सिटी मध्ये लहान घ्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला चढवल्यानंतर प्राणी प्रेमी आणि सोसायटीतील रहिवासी यांच्यातील भांडणांचा वाद तर पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. तसेच तक्रारीही दाखल झाल्या होत्या.

हातात दंडुका घेऊन शतपावली

कुत्रा चावण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे भीतीपोटी काही ज्येष्ठ नागरिक स्वसंरक्षणार्थ हातामध्ये दंडुका घेऊन शतपावली करताना दिसत आहेत. लहान मुले खेळत असताना त्यांच्यासोबत असलेली आई हातामध्ये काठी घेऊन बसत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. आमचा जीव वाचवण्यासाठी हे करणे भाग असल्याची भूमिका काही नागरिकांनी मांडली.

दिलीप चौधरी (बालक)

मी घरातून सोसायटीतील मैदानात आलो. त्यावेळेस मागून येऊन एका कुत्र्याने मला पायावर चावा घेतला. तेव्हापासून मला खाली खेळण्यासाठी यायची भीती वाटते. पालक सोबत असतील तेव्हाच मी खाली येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT