A four-storey building constructed illegally in Santnagar area of ​​Lohgaon on Saturday has been demolished by the Municipal Corporation..jpg 
पुणे

लोहगाव येथे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर हातोडा

सुषमा पाटील.


रामवाडी ( पुणे ) : लोहगाव येथील संतनगर भागात शनिवारी अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या चार मजली इमारतीवर महापालिकेच्यावतीने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई महापालिकेचे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 
हे ही वाचा : महापालिका आणि सोसायटीच्या वादात मात्र शेजारील बिल्डींगच्या नागरिकांना नाहक त्रास

संतनगर येथे शनिवारी कटरच्या सहाय्याने सुमारे साडे अकरा हजार स्केवर फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नगररोड भागात अनधिकृत बांधकामे मोठया प्रमाणात वाढत आहे. एकीकडे शहराचा नियोजनबद्ध विकास आणि स्मार्ट पुण्याच्या चर्चा फक्त होत असताना दुसऱ्या बाजूला अनधिकृत बांधकामावर वेळीच लक्ष न दिल्याने परिसरात कमी गुंठ्यामध्ये चार ते पाच मजली बिल्डिंगची  बांधकामे वाढू लागली आहे. अशी बांधकामे करताना महापालिकेची कायदेशीर परवानगी न घेता बांधकाम केली जात आहे. यामुळे स्वस्त दरात सदनिका घेणारे ग्राहक कोणतीही चौकशी न करता घर खरेदी करतात व फसवणुकीला बळी पडतात. 

यावेळी उपअभियंता किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता फारुख पटेल, दत्ता चव्हाण, निळकंठ शिलवंत यांच्या पथकाने एक जॉब कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. यावेळी स्थानिक विमानतळ पोलिस ठाणे महापालिकेकडील मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  
 
शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, नागरिकांनी बांधकामे करताना महापालिकेची परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. अनधिकृत बांधकामे केलेल्या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी करू नयेत. यापुढे अनधिकृत बांधकामावर सातत्याने कारवाई  केली जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update : भाजपकडून २६ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

SCROLL FOR NEXT