पुणे

मित्राचा खून करुन अपघाताचा देखावा करण्याचा प्रयत्न; खेड पोलिसांकडून पर्दाफाश  

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : दारू पिताना अज्ञात कारणावरून झालेल्या भांडणातून चौघांनी तरुणाचा खून केला आणि मोटारसायकलसह मृतदेह खेड घाटात आणून टाकून, अपघाताचा देखावा केला. पण खेड पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणून तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक जण फरार आहे. न्यायालयाने संशयित आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

मयूर सुरेश एरंडे (वय २५, रा. थुगाव, ता.आंबेगाव) असे या गुन्ह्यातील मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - नाशिक महामार्गावरील, खेड घाटात मंगळवारी एका अज्ञात युवकाचा मृतदेह खेड पोलिसांना आढळून आला. बाजूलाच एक मोटारसायकल पडलेली होती. त्यामुळे साहजिकच हा अपघात आहे, असे प्रथमदर्शनी वाटत होते.

तरीही पोलिसांनी मृतदेह बारकाईने पाहिल्यावर मृताच्या डोक्यात जखम असल्याचे दिसले. ही जखम अपघाताची नसून हत्याराची असल्याचे त्यांच्या चाणाक्ष नजरेस जाणवले. साधारणपणे अपघातात खरचटल्याच्या जखमा शरीरावर असतात तशा त्या आढळल्या नाहीत. अपघातात होते तसे मोटारसायकलचे नुकसान झालेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी सावधपणे खून असण्याची शक्यता लक्षात घेऊन कसून तपास केला.

मृत तरुणाच्या खिशात त्याचे ओळखपत्र होते.  त्यावरून पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधल्यावर खरी हकीकत पुढे आली. गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेल्या गुल्या ऊर्फ आदित्य बबन नवले याचे मंचरमध्ये मोबाईल शॉपीचे दुकान आहे. त्याच्याकडे मयूर एंरडे कामाला होता. मंगळवारी रात्री गुल्या नवले, गणेश भास्कर वाबळे, सोन्या ऊर्फ आनंद सुधीर नाटे (सर्व रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि साहील अंबादास सुरवसे (रा. निघोटवाडी, ता. आंबेगाव) या चौघांबरोबर, एंरडे दारू पिण्यास गेला. मंचरजवळील बुवासाहेब मंदिराच्या टेकडीवर ते दारू पिण्यास बसले. दारूच्या नशेत भांडण झाल्यावर मृत एरंडे याने नवलेच्या कानाखाली मारली. त्यामुळे इतरांनी चिडून एरंडेच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी खोऱ्याने घाव घालून खून केला. हा खून अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह आणि मोटारसायकल  खेड घाटाच्या एका वळणावर आणून टाकली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी मयूरचे वडील सुरेश लक्ष्मण एरंडे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून खेड पोलिसांनी चौघांवर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहेत. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT