crime-logo.jpg
crime-logo.jpg 
पुणे

कमी पैशात थायलंड सफर घडवण्याच्या बहाण्याने पावणे बारा लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कमी पैशात थायलंडची सफर घडवून आणण्याचा बहाणा करुन दोघांनी कोंढवा बुद्रुक परिसरातील येथील नागरिकांची तब्बल पावणे बारा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अरविंदकुमार माळी (वय 23, रा. कोंढवा-बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यात प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक   
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना कमी पैशात थायलंड येथे सहल नेण्याबाबतची जाहिरात लावण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादीसह अनेकांनी येवलेवाडीत येथे राहणाऱ्या व संबंधीत जाहीरात देणाऱ्या दोघांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी कमी किंमतीमध्ये चांगल्या सहलीचे नियोजन केले असल्याचे नागरिकांना सांगितले. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांना प्रतिसाद दिला. फिर्यादी यांच्यासह अनेक नागरिकांनी सहलीसाठी तब्बल पावणे बारा लाख रुपये त्यांच्या कार्यालयामध्ये भरले. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्याकडे सहलीला नेण्यासाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, वारंवार संपर्क करुनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच नागरिकांनी दिलेले पैसेही त्यांना परत मिळाले नाही.
पुण्यात भेळ विक्रेत्यासह कामगारास टोळक्‍याकडून दांडक्‍याने जबर मारहाण  
2018 ते मे 2019 या कालावधीमध्ये हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. 
पुण्यातील प्लॅस्टिकचे कप बनविणाऱ्या कंपनीत शॉर्टसर्कीटमुळे आग   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT