fraud continues in the name of PAYTM KYC with Citizens in pune 
पुणे

पेटीएम अपडेट करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक सुरूच

सकाळवृत्तसेवा

पुणे : पेटीएम अद्ययावत करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक फसवणूकीच्या प्रकारास प्रतिसाद देऊ नका, असे सायबर पोलिसांकडून वारंवार सांगितल्यानंतरही पेटीएम केवायसीला बळी पडत असल्याची सद्यस्थिती आहे. पेटीएम अद्ययावत करुन देण्याच्या नावाखाली एका वृद्धासह दोघांना तब्बल एक लाख 35 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. 

पुणे : नागरिकांची संख्या 40 हजार अन् पोलिस फक्त 28

शहरात मागील काही महिन्यांपासून पेटीएम अद्ययावत करण्यासाठी केवायसीचा बहाणा करून अनोळखी व्यक्ती महिला, वृध नागरीकांना फोन, मेसेज व लिंक पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या घटना सातत्याने करीत आहेत. मागील दिड महिन्यात 158 जणांची 18 लाखांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले होते. त्यानंतरही नागरीक अनोळखी नागरीकांच्या बोलण्यास बळी पडत असल्याची सद्यस्थिती आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या 75 वर्षीय नागरीकांने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 23 डिसेंबर 2019 रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. त्यावर पेटीएम केवायसी अद्ययावत करण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार फिर्यादीने संबंधीत मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने फिर्यादी यांना क्विक सपोर्ट हे ऍप डाऊनलोड करण्यात सांगितले. ते ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्याने फिर्यादीस दहा रुपये त्याद्वारे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ज्या क्रेडीट कार्डद्वारे पैसे भरले, त्याचे दोन्ही बाजुंनी फोटो काढून ते पाठविण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच फिर्यादीच्या खात्यातील 75 हजार रुपये अनोळखी व्यक्तींनी काढून घेतले. 

व्हाईस रेकॉर्ड करा अन् फेसबुककडून पैसे मिळवा!

हडपसर येथील एका 42 वर्षीय महिलेचीही याच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. तिने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेसही ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बॅंक खात्यातील 60 हजार रुपये काढून घेतले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : देशातील पहिली डबल डेकर आणि एटीएम सुविधा असलेली ‘पंचवटी एक्सप्रेस’ आज ५० वर्षांची!

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT