fraud with housewife by pretext of won 25 lakhs Lottery in kaun banega karodpati
fraud with housewife by pretext of won 25 lakhs Lottery in kaun banega karodpati 
पुणे

कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून गृहिणीची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे : दूरचित्रवाणीवरील कौन बनेगा करोडपती (केबीसी) या कार्यक्रमामध्ये 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून अनोळखी व्यक्तींनी एका गृहीणीला तब्बल 87 हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या 7 ऑक्‍टोबर 2019 या दिवशी सकाळी नऊ वाजता त्यांच्या घरी काम करीत होत्या. त्यावेळी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन त्यांना फोन आला. "तुम्हाला कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.' असे त्यांनी महिलेला सांगितले. 

आता पीएमपी राबविणार दर महिन्याला 'बस डे`

प्रारंभी महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना वेगवेगळ्या क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधून त्यांना लाटरी लागल्याची बतावणी केली. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कौन बनेगा करोडपती (कीबीसी) लॉटरी क्रमांक 231 व त्यावर 25 लाख रुपये छापलेले तिकीट व्हाटस्‌अपद्वारे पाठवून दिले. त्याद्वारे फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करुन लॉटरीचे पैसे फिर्यादीस मिळावेत, यासाठी जीएसटी व इन्कमटॅक्‍स भरण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडून वेळोवेळी 87 हजार 200 रुपयांची रक्कम ऑनलाईन माध्यमाद्वारे भरण्यास सांगितले
 

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...

फिर्यादी यांनी लॉटरीचे पैसे मिळण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले. तेथून हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT